-
तुम्हीही स्वस्तात एखादे घर किंवा प्रॉपर्टीच्या शोधात आहात का? जर तुमचं उत्तर हो असेल तर देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया(SBI) तुम्हाला स्वस्तात घर/प्रॉपर्टी खरेदी करण्याची सुवर्णसंधी देत आहे.
-
स्टेट बँक ऑफ इंडिया अनेक प्रॉपर्टींचा लिलाव करणार आहे. एसबीआयकडून निवासी आणि व्यावसायिक मालमत्तेचा (Residential and Commercial Property)मोठा लिलाव आयोजित करण्यात आला आहे. तुम्हालाही या लिलाव प्रक्रियेत सहभागी होता येईल.
-
एसबीआयकडून डिफॉल्टर्सच्या म्हणजेच कर्ज न फेडणाऱ्यांच्या निवासी आणि व्यावसायिक मालमत्तेचा लिलाव करण्यात येणार आहे.
-
डिफॉल्टर्स म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर ज्यांनी वेळेवर बँकेचं कर्ज फेडलं नाही अशा व्यक्तींच्या संपत्तीचा कर्ज वसुलीसाठी लिलाव केला जातो. या मालमत्तेची किंमत रिअल इस्टेट बाजारभावातील किंमतीच्या तुलनेत बरीच कमी असते.
-
SBI ने अधिकृत ट्विटर अकाउंटद्वारे या लिलावाबाबत माहिती दिलीये. लिलावात सहभागी होण्यासाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज करु शकतात. जाणून घेऊया सविस्तर :
-
ही लिलावाची प्रक्रिया 30 डिसेंबर रोजी होणार असून सहभागी होण्यासाठी तुम्हाला ३० डिसेंबरपूर्वी रजिस्टर करावं लागेल.
-
त्यानंतर, पुढील 7 दिवसात – 758 (रेसिडेंशियल) 251 (कमर्शियल) 98 (इंडस्ट्रियल) आणि पुढील 30 दिवसात- 3032 (रेसिडेंशियल) 844 (कॉमर्शियल) 410 (इंडस्ट्रियल) इतक्या मालमत्तांचा लिलाव होईल, अशी माहिती एसबीआयकडून देण्यात आली आहे.
-
लिलावाच्या आधी खरेदीदाराला मालमत्तेचे आवश्यक सर्व डिटेल्स दिले जातात. लिलाव प्रक्रियेत भाग घेण्याआधी बँकेकडून मालमत्तेचे लोकेशन, आकारमान आदी माहिती घेता येते.
-
ऑनलाइन संकेतस्थळावर बँकेकडून काही आवश्यक कागदपत्रांची मागणी करण्यात आली आहे. आवश्यक कागदपत्रांमध्ये डिजिटल स्वाक्षरीसोबत केवायसी कागदपत्रांचा समावेश आहे. तसेच, EMD म्हणजे अर्नेस्ट मनी डिपॉजिट करावे लागतील. जवळच्या शाखेमध्ये जाऊन किंवा ऑनलाइन तुम्हाला ही कागदपत्रे भरावी लागतील त्यानंतर तुम्ही या प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतात.
-
या लिलावात सहभागी व्हायचं असल्यास किंवा अधिक माहितीसाठी एसबीआयने काही वेबसाइटच्या लिंक शेअर केल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे >> bankeauctions.com/Sbi; >> sbi.auctiontiger.net/EPROC/; >> ibapi.in; and >> mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”