-
करोना आणि लॉकडाउनमुळे आर्थिक चणचण जाणवतेय म्हणून कर्ज घेण्याच्या विचारात आहात? महत्त्वाचं म्हणजे Instant loan App वरून कर्ज घेण्याच्या विचारात असाल, तर जरा थांबा. त्या आधी रिझर्व्ह बँकेने काय सावधगिरीचा इशारा दिलाय तो वाचा. (संग्रहित छायाचित्रं/इंडियन एक्स्प्रेस)
-
कमी व्याजदराचे प्रलोभन देऊन कर्जाच्या ऑफर देणाऱ्या Instant loan App कंपन्यांनी गोरखधंदाचं सुरू केल्याचं रिझर्व्ह बँकेकडे आलेल्या तक्रारीतून दिसून आलं आहे.
-
सर्वसामान्यांना आणि छोट्या व्यावसायिकांना भूरळ पाडणारी आणि झटपट कर्ज देणाऱ्या अनधिकृत डिजिटल वित्तपुरवठा करणाऱ्या कंपन्या तसेच मोबाइल अॅप्सबद्दल सावधगिरी बाळगली जावी, असा इशारा रिझव्र्ह बँकेने दिला आहे.
-
रिझव्र्ह बँकेने अशा लुबाडणाऱ्या कर्जदात्या कंपन्यांचा सुळसुळाट झाला असल्याची कबुली देणारा अहवालच तयार केला आहे.
-
अशा कोणत्याही अज्ञात व्यक्ती अथवा अनधिकृत अॅप्स अथवा डिजिटल पोर्टलवर आपले ‘केवायसी’ दस्तऐवजांच्या प्रती देऊ नयेत, असा सावधगिरीचा सल्ला रिझर्व्ह बँकेने नागरिकांना दिला आहे.
-
अशा फसव्या अॅप्स आणि प्रकरणांची माहिती संबंधित तपास यंत्रणांनाही कळविण्यास सांगण्याचं आवाहन आरबीआयने केलं आहे.
-
अनधिकृत मोबाइल अॅप्सद्वारे ग्राहकांच्या दस्तऐवजांचा तसेच त्यांच्या मोबाइलवर माहितीचा प्रसंगी गैरवापर होण्याची शक्यता आहे, अशा धोक्याचा इशाराही रिझर्व्ह बँकेने दिला आहे. कर्जदारांवर वाजवीपेक्षा जास्त व्याजाचा दर आणि अनेक छुप्या शुल्कांची वसुलीदेखील त्यांच्याकडून केली जाते.
-
कर्जवसुलीसाठीही अयोग्य आणि बेकायदेशीर मार्गाचा वापर केला जातो, अशाही लोकांच्या तक्रारी आहेत. अशा फसगत झालेल्या लोकांना ऑनलाइन तक्रार दाखल करण्यासाठी रिझव्र्ह बँकेने संकेतस्थळावर (https:achet.rbi.org.in)विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
-
अलिकडेच गुरुग्राम आणि हैदराबादमध्ये चार इस्टंट लोन अॅप्सच्या कार्यालयांवर छापा टाकण्यात आला होता. या कार्यालयांची झाडाझडती घेतल्यानंतर लोकांना लुबाडण्याचा काम जकार्तामधून सुरू असल्याचं समोर आलं होतं. हैदराबादचे सहपोलीस आयुक्त अविनाश मोहंती यांनी सांगितलं की, या चार कार्यालयातून ३० लोन अॅप्स चालवली जात होती.
-
इन्स्टंट लोन देणाऱ्या अॅप्सकडून झालेल्या छळामुळे तेलंगणात एका महिन्यात तीन तरुणांनी आत्महत्या केल्याच्याही घटना घडल्या आहेत. कर्जाचे हप्ते थकल्याने कंपन्यांनी त्यांच्या खासगी माहितीचा गैरवापर केल्याचंही समोर आलं आहे. (संग्रहित छायाचित्रं/इंडियन एक्स्प्रेस)

‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…