-
देशातील प्रमुख कार कंपन्यांपैकी एक होंडा कार्स इंडिया लिमिटेडने (HCIL) काही दिवसांपूर्वीच आपला ग्रेटर नोएडामधील मॅन्युफॅक्चरिंग प्लांट बंद करण्याची घोषणा केली आहे. परिणामी आता कंपनीचा भारतात एकाच ठिकाणी म्हणजे राजस्थानच्या टापूकारा येथे मॅन्युफॅक्चरिंग प्लांट राहिलाय.
-
ग्रेटर नोएडामधील मॅन्युफॅक्चरिंग प्लांट बंद केल्यानंतर आता कंपनीने आपल्या दोन कारचं प्रोडक्शनही थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रेटर नोएडामधील प्रकल्पात कंपनीकडून Honda City, Honda Civic आणि Honda CR-V या गाड्यांचं प्रोडक्शन घेतलं जायचं. पण आता कंपनीने या तीनपैकी दोन कारचं उत्पादन थांबवण्याचं जाहीर केलंय.
-
होंडा कार इंडियाने करोना संकट काळात सप्टेंबरपासून Tapukara plant मध्ये आपल्या वाहनांचे प्रोडक्शन सुरू केले आहे. या दरम्यान नोएडा प्लांट बंद करण्यात आला आहे. नोएडा प्लांट बंद झाला असला तरी कंपनीचे हेडक्वॉर्टर, रिसर्च अँड डेव्हलेपमेंट आणि स्पेयर पार्ट्स ऑपरेशन नोएडामध्येच कायम राहिल, असंही कंपनीने स्पष्ट केलं.
-
दरम्यान, ग्रेटर नोएडा प्लांट बंद केल्यानंतर लगेचच जानेवारी २०२१ पासून होंडाच्या गाड्यांच्या किंमतीत वाढ होणार असल्याचं समोर आलं असून याबाबत कंपनीच्या सर्व डिलर्सना सूचनाही देण्यात आल्या आहेत. कोणत्या मॉडेल्सच्या किंमतीत किती रुपये वाढ झाली आहे याची माहिती देण्यासाठी कंपनीकडून जानेवारी 2021 मध्ये सर्व मॉडेल्सच्या नव्या किंमतीची यादी जाहीर केली जाईल.
-
Honda ने कोणत्या गाड्या केल्या बंद? ग्रेटर नोएडामधील मॅन्युफॅक्चरिंग प्लांट बंद केल्यामुळे कंपनीने आपल्या Honda Civic आणि Honda CR-V या दोन शानदार कारचं प्रोडक्शन थांबवल्याचं जाहीर केलं आहे. ग्रेटर नोएडामधील प्रकल्पात कंपनीकडून Honda City, Honda Civic आणि Honda CR-V या गाड्यांचं प्रोडक्शन घेतलं जायचं. आता Honda City चं प्रोडक्शन राजस्थानच्या टापूकारा येथील प्रकल्पात घेतलं जाणार आहे. तर Honda Civic आणि Honda CR-V या गाड्या आता बाजारात उपलब्ध होणार नाहीत. दोन्ही गाड्यांची विक्री काही काळापासून कमी झाली होती. कमी विक्रीमुळे ग्रेटर नोएडातील कारखाना बंद झाल्यानंतर कंपनीने या दोन्ही कारचं प्रोडक्शन टापूकारा प्लांटमध्ये शिफ्ट करण्याऐवजी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षभरात किआ मोटर्स आणि एमजी यांसारख्या नवीन कंपन्यांनी लाँच केलेल्या नवनव्या गाड्यांचा फटकाही Honda Civic आणि Honda CR-V या दोन कार्सना बसला आणि त्यामुळे दोन्ही गाड्यांची मागणी कमी झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात भारतीय बाजारात या दोन्ही कार दिसणार नाहीत.

Pakistan PM Shahbaj Sharif : “पहलगाम हल्ल्याप्रकरणी आम्ही तटस्थ चौकशीला तयार”; पाकिस्तानच्या पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया!