-
जर तुमच्याकडेही Maruti Suzuki ची एखादी कार असेल तर कंपनीने आणलेल्या एका शानदार ऑफरचा तुम्ही लाभ घेऊ शकतात.
-
देशातील प्रमुख कार कंपनी असलेल्या मारुतीने आपल्या ग्राहकांसाठी 'विंटर सर्व्हिस कॅम्पेन' (Maruti Suzuki Winter Service Campaign) सुरू केलं आहे.
-
मारुती सुझुकीने हा कॅम्प देशभरातील सर्व अधिकृत डीलरशीपमध्ये सुरू केला आहे.
-
5 जानेवारी 2021 पर्यंत मारुतीच्या कार वापरणाऱ्या ग्राहकांना या 'विंटर सर्व्हिस कॅम्पेन' चा फायदा घेता येईल.
-
कंपनीच्या या 'विंटर सर्व्हिस कॅम्पेन'मध्ये ग्राहकांना फ्रीमध्ये कारची सर्व्हिसिंग करता येईल. या ऑफरअंतर्गत कंपनीकडून फ्री '27 पॉईंट व्हेईकल चेकअप'ची सुविधा मिळेल, शिवाय अन्य अॅक्सेसरीजवरही अनेक ऑफर्स मिळतील. जाणून घेऊया ऑफर –
-
'विंटर सर्व्हिस कॅम्पेन' अंतर्गत कस्टमर्सला फ्री 27 पॉईंट व्हेईकल चेकअपशिवाय अॅक्सेसरीजवर ऑफर्सचा फायदा मिळेल. यात लाइटनिंग, हीटिंग, व्हेंटिलेशन सिस्टिम, बॅटरी, ब्रेक आणि इतर गोष्टींचं इन्स्पेक्शन होईल.
-
या ऑफरमध्ये तज्ज्ञ टेक्निशियन चेकलिस्टनुसार ग्राहकांच्या कारची तपासणी करतील.
-
कारच्या सर्व्हिसिंगनंतर सर्व्हिस लेबर चार्जमध्येही कंपनीकडून सूट मिळेल. याशिवाय एक्स्टेंडेड वॉरंटी, स्पेयर पार्ट्स खरेदी केल्यास वॉशिंगची सुविधाही मोफत मिळेल.
-
हिवाळ्यात थंडीमुळे कारला ज्या समस्यांचा सामना करावा लागतो त्याकडे विशेष लक्ष दिलं जाईल.
-
थंडीच्या दिवसांमध्ये व्हिजिबिलिटी कमी असते, त्यामुळे फॉग लॅम्प, टेल लॅम्प आणि हेड लॅम्पच्या सर्व्हिसिंगकडेही विशेष लक्ष दिलं जाईल. थंडीच्या दिवसांमध्ये कारला कोणतीही समस्या जाणवू नये आणि थंडीच्या हंगामात कार मालकांना एक सुखद अनुभव मिळावा, हा विंटर सर्विस कॅम्पेनचा हेतू असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं. 5 जानेवारी 2021 पर्यंत तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकतात.

भर रस्त्यात दोन सापांचं मिलन; पण लोकांनी मध्येच काय केलं पाहा, अंगावर काटा आणणारा VIDEO होतोय व्हायरल