देशातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंबीय कायमच चर्चेत असतात. कधी त्यांच्या कंपन्यांमुळे तर कधी त्यांच्या लाइफस्टाइलमुळे. अंबानी कुटुंबीयांचं घर कसं असेल, त्यांचा दिनक्रम नेमका कसा असेल याविषयी कायमच लोकांमध्ये उत्सुकता असते. त्यामुळे मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी यांचा दिनक्रम नेमका कसा आहे हे जाणून घेऊयात. ( सौजन्य : इंडियन एक्स्प्रेस, जनसत्ता) नीता अंबानी बऱ्याच वेळा त्यांच्या लक्झरी लाइफस्टाइल आणि महागड्या वस्तूंमुळे चर्चेत असतात. सध्या सोशल मीडियावर नीता अंबानी यांच्या डेली रुटीनची चर्चा रंगली आहे. मुकेश अंबानींप्रमाणेच नीता अंबानीदेखील सकाळी ५ -५.३० वाजता उठतात आणि त्यांच्या दिवसाची सुरुवात करतात. नीता अंबानी फिटनेसच्या बाबतीत सजग असून त्या दररोज न चुकता वर्कआऊट करतात. नीता अंबानी यांना डान्सची आवड आहे. त्यामुळे त्या डान्सच्या माध्यमातूनदेखील स्वत: ला फिट ठेवण्याचा प्रयत्न करतात. नीता अंबानी त्यांच्या आहाराच्या बाबतीतही सजग आहेत. आहारात त्या कायम पौष्टिक पदार्थांचाच समावेश करतात. सकाळच्या नाश्तामध्ये त्या सुकामेवा, एग व्हाइट ऑमलेट आणि बीटाचा रस पितात. साधारपणे नीता आणि मुकेश अंबानी १०-११ वाजता घरातून बाहेर पडतात आणि कामाकडे वळतात. नीता अंबानी रात्रीचं जेवण सगळ्या कुटुंबासोबत घेतात. यातदेखील त्या हलका आहार घेतात. मुकेश अंबानीदेखील नाश्त्यामध्ये पपईचा ज्यूस, दलिया किंवा दही-पोळी खातात. ( सौजन्य : इंडियन एक्स्प्रेस, जनसत्ता)
Pahalgam Terrorist Attack : “माझ्या नवऱ्यावर दहशतवाद्यांनी पहिली गोळी झाडली, सरकारने…”, शुभम द्विवेदीच्या पत्नीची मागणी काय?