-
नवीन वर्षात स्वतःचं नवं घर किंवा कार खरेदी करण्याचं तुमचंही स्वप्न असेल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. देशातील दुसरी मोठी सरकारी बँक अर्थात पंजाब नॅशनल बँक (PNB) ही संधी देत आहे.
-
पीएनबीने आपली 'फेस्टिवल बोनांझा ऑफर' (Festival Bonanza Offer) ३१ मार्च २०२१ पर्यंत वाढवली असून आता या ऑफरला पीएनबी न्यू इयर बोनांझा-२०२१ (PNB NEW YEAR BONANZA-2021) असं नाव देण्यात आलं आहे.
-
31 मार्चपर्यंत ऑफर : या ऑफरअंतर्गत तुम्हाला कर्ज घेतल्यास प्रोसेसिंग चार्ज (Processing Fee) आणि डॉक्युमेंट चार्ज आकारला जाणार नाही. बँक आपले काही रिटेल प्रोडक्ट (Retail Product) उदा. होम लोन, कार लोन यांवर प्रोसेसिंग चार्ज किंवा डॉक्युमेंट चार्ज आकारणार नाही. ग्राहक या ऑफरचा फायदा पीएनबीच्या देशातील कोणत्याही शाखेतून किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे घेऊ शकतात.
-
स्वस्तात कर्ज : ग्राहकांना स्वस्त आणि सहजसोप्या मार्गाने कर्ज मिळावं हा यामागचा बँकेचा हेतू आहे. नवीन किंवा टेकओव्हर लोन घेतल्यास प्रोसेसिंग फी कमी करण्यात आली आहे. बँकेनुसार, होम लोनवर ग्राहकांना आता लोनच्या रक्कमेच्या 0.35 टक्के (जास्तीतजास्त 15,000 रुपये) आणि याशिवाय डॉक्युमेंट चार्जमध्ये सूट मिळेल. अशाचप्रकारे कार लोनवरही ग्राहकांची लोनच्या रक्कमेच्या 0.25 टक्के बचत होईल. तर, लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी घेणाऱ्यांना प्रोसेसिंग फीमध्ये कर्जाच्या रक्कमेवर जास्तीत जास्त 1 लाख रुपये सूट मिळेल.
-
सध्याचा व्याजदर : पीएनबी सध्या होम लोनवर 7.10 टक्के (Home Loan interest rate) आणि कार लोनवर 7.55 टक्के (Car loan interest rate ) ऑफर करत आहे. उल्लेखनीय म्हणजे पंजाब नॅशनल बँकेने 1 सप्टेंबर 2020 पासूनच फेस्टिवल बोनांजा ऑफरअंतर्गत आपल्या होम आणि कार लोनच्या दरांमध्ये कपात केली आहे.

‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…