-
करोना म्हणजेच ‘सार्स कोविड २’ या विषाणूने जगात प्रवेश करून आता एक वर्ष होत आहे. या विषाणूचे लक्ष्य झालेल्यांना या आजाराचे काही आठवडे, काही महिने, नव्हे तर पूर्ण वर्षभर दुष्परिणाम जाणवत आहेत.
-
(संग्रहित छायाचित्र)
-
लाँग कोविडची विशिष्ट व्याख्या सांगणारे पाठय़पुस्तक अस्तित्वात नसले तरीही कोविड होऊन गेल्यानंतर सहा महिन्यांपर्यंत त्याची लक्षणे दिसून येणाऱ्या रुग्णांना लाँग कोविडची लागण झाल्याचे म्हटले जाते.
-
यात केवळ दीर्घकाळ अतिदक्षता विभागात दाखल झालेल्या रुग्णांचाच समावेश नसून ज्या रुग्णांना कोविडची अगदी सूक्ष्म लक्षणे दिसून आली आणि ज्यांना रुग्णालयात भरती होण्याची गरजही भासली नाही, अशा रुग्णांचाही यात समावेश आहे.
-
थकवा येणे, कमी हालचालीनंतरही श्वास घेण्यास त्रास होणे, खोकला, स्नायूदुखी ही लाँग कोविडची सर्वसाधारण लक्षणे आहेत.
-
तसेच सांधेदुखी, ऐकू कमी येणे, दृष्टीदोष, वास न येणे आणि तोंडाची चव जाणे ही सुद्धा लाँग कोविडची सर्वसाधारण लक्षणे आहेत.
-
लाँग कोविड झालेल्या अनेक रुग्णांना मानसिक स्वास्थ्यविषयक समस्याही उद्भवल्याचे दिसून आले आहेत.
-
प्रातिनिधीक छायाचित्र
-
संग्रहीत
-
रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात आलेल्या कोविडमधून बऱ्या झालेल्या रुग्णांचा यात अभ्यास करण्यात आला होता. या अभ्यासांती असे दिसून आले की कोविड १९मधून बऱ्या झालेल्या रुग्णांपैकी ८७.४ टक्के रुग्णांमध्ये बरे झाल्यानंतर जवळपास २ ते ३ महिन्यांपर्यंत आजाराची लक्षणे दिसत होती.करोना १०० टक्के बरी होतो का, असा प्रश्न अनेकजण विचारतात. पण या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर देता येत नाही. करोनाचे दीर्घकालीन परिणाम समजून घेण्यासाठी जगभर हा अभ्यास आयोजित केला असून करोनानंतर पूर्णत: बरे झालेल्या रुग्णांपैकी बहुतांश रुग्णांना पुन्हा काही लक्षणांना सामोरे जावे लागत आहे. ( सर्व माहिती – डॉ. राहुल पंडित, अतिदक्षता विभाग प्रमुख, फोर्टिस रुग्णालय )
Zapuk Zupuk: सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’ने पहिल्या दिवशी कमावले ‘इतके’ लाख