-
हिवाळा आला की दम्याचे प्रमाण वाढते. दमा वाढण्यामागे सर्वात महत्त्वाचे कारण वाढते प्रदूषण आहे. हवेतील धूलिकणांमुळे श्वास घेण्यास अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे दमा रोखण्यासाठी वेळीच उपचार घेणे आवश्यक आहे.
-
दमा हा श्वसनमार्गातील दाह किंवा सूज यांमुळे अधिक तीव्र होऊ शकतो. त्यामुळे त्याच्यावर उपचारासाठी योग्य ती औषधे तसेच तोंडाने ओढणारी औषधे (इनहेलर) किंवा गोळ्यांच्या स्वरूपातील औषधे घ्या. त्याचबरोबर घेत असलेल्या उपचारपद्धतींचा परिणाम वेळोवेळी अभ्यासला पाहिजे.
-
भरपूर पाणी प्या आणि बॉडी हायड्रेटेड असली की श्वसननलिकेमध्ये धूलिकण, प्रदूषणामुळे स्रवणारे चिकट पदार्थ सहजपणे बाहेर पडण्यास मदत होते.
-
घरातील हवा खेळती राहावी. हवा स्वच्छ ठेवणारे प्युरिफायर अथवा एसी वापरावा. तसेच ओलसर भिंतीमुळेही दमा वाढवू शकतात. घरातील पडदे नेहमीच झटकून ठेवा. बेडशीट्स, रोजच्या वापराचे कपडे, उशीचे कव्हर दररोज बदला.
-
आजारी रुग्णांशी संपर्क टाळा. त्यामुळे लवकर संसर्ग होणार नाही.
-
डॉक्टरांशी बोलून फ्लू प्रतिबंधात्मक लस टोचून घ्या.
-
घरातील पाळीव प्राण्यांची स्वच्छता राखणे अतिशय महत्त्वाचे आहे. प्राण्यांच्या केसांमुळे अॅलर्जी होण्याची शक्यता असते.
-
दम्याचे प्रमाण वाढल्यास त्या व्यक्तीने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधांचा डोस घ्यावा. तसेच औषधांचे काही दुष्परिणाम टाळता येतील यासंबंधीही संबंधित डॉक्टरांशी चर्चा करावी.
-
गरम पदार्थ खा आणि थंड हवेपासून रक्षण करतील अशा कपडय़ांचा वापर करा.
-
डॉक्टरांच्या सल्ल्याने अचूक औषधोपचार केल्यास आजाराचा होणारा त्रास नक्कीच टाळता येऊ शकतो. ( सर्व माहिती – डॉ. अरविंद काटे, फुप्फुसविकारतज्ज्ञ )

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल