-
MG Motor India ने आज (दि.7) भारतात आपली लोकप्रिय एसयूव्ही MG Hector नव्या अवतारात (MG Hector Facelift ) लाँच केली. यासोबतच कंपनीने 7 सीटर Hector Plus देखील लाँच केली आहे.
-
MG हेक्टर 2021, ही एसयूव्ही म्हणजे दोन वर्षांपूर्वी लाँच झालेल्या Hector एसयूव्हीसाठी अपडेटेट फेसलिफ्ट व्हर्जन आहे. तर, कंपनीने 6 सीटर Hector Plus जुलै 2020 मध्ये लाँच केली होती. आता कंपनीने हेक्टर प्लस 7 सीटर देखील लाँच केली आहे.
-
MG हेक्टर 2021 या एसयूव्हीमध्ये अनेक अपडेटेड फिचर्स आहेत. पण सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यात ‘हिंग्लिश’ व्हॉइस कमांड्स या ऑटो सेगमेंटमध्ये प्रथमच देण्यात आलेल्या फिचरचा समावेश आहे.
-
‘हिंग्लिश’ व्हॉइस कमांड्स म्हणजेच इंग्लिशसोबत हिंदीत व्हॉइस कमांडची सुविधा मिळते. कारमध्ये बसताच तुम्ही हिंदीत एफएम चलाओ, एसी का टेंपरेचर कम कर दो, इंग्लिश गाना बजाओ किंवा खुल जा सिमसिम असं बोलून सनरुफ उघडण्याची कमांड देता येते. हिंदीत दिलेल्या कमांडवर कार लगेच प्रतिसादही देते. MG Hector फेसलिफ्टला विविध इन-कार फंक्शन्स नियंत्रित करण्यासाठी 35 पेक्षा जास्त हिंग्लिश कमांड समजतात.
-
2021 MG हेक्टर स्टायलिश, स्टनिंग आणि बोल्ड लूकमध्ये आकर्षक दिसते. यात वायरलेस चार्जिंग, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स (फर्स्ट-इन-सेगमेंट), नवीन थर्मो प्रेस्ड बोल्ड फ्रंट क्रोम ग्रिल, फ्रंट व बॅकमध्ये नवीन गन मेटल ग्रे स्किड प्लेट्स, शँपेन अँड ब्लॅक थीम इंटीरिअर, 18 इंच ड्युअल टोन मशीन अलॉय व्हील्स असे अनेक फिचर्स आहेत.
-
नवीन हेक्टर फेसलिफ्टमध्ये कनेक्टेड कार टेक्नॉलॉजीसाठी दिलेले आयस्मार्ट इंटरफेसही अपग्रेडेड आहे. वाय-फायद्वारे कनेक्ट आणि स्मार्ट वॉचद्वारे रिमोट कंट्रोल कनेक्टिव्हिटीचा पर्यायही यामध्ये आहे.
-
MG Hector फेसलिफ्ट इंजिन : MG Hector फेसलिफ्टमध्ये 1.5 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन, 1.5 लीटर हायब्रिड आणि 2.0 लीटर डिझेल इंजिन आहे. पेट्रोल इंजिनसह मॅन्यूअल व DCT ट्रान्समिशन आहे. तर, डिझेल इंजिनसोबत केवळ मॅन्यूअल ट्रान्समिशन मिळेल. हेक्टर 2021 मध्ये 6 एअरबॅग्स, 360 डिग्री कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोलसह 25 पेक्षा जास्त सेफ्टी फिचर्स दिलेत.
-
7 सीटर MG Hector Plus इंजिन :एमजी मोटर्सने भारतात 6 सीटर Hector Plus जुलै 2020 मध्ये लाँच केली होती. आता कंपनीने हेक्टर प्लस 7 सीटर देखील लाँच केली आहे. 7 सीटर MG Hector Plus मध्ये 2.0 लिटर टर्बो डिझेल इंजिन आणि 1.5 लिटर पेट्रोल इंजिन आहे. पेट्रोल इंजिनसोबत मॅन्यूअल आणि 48-V माइल्ड हायब्रिड मॅन्यूअल ट्रान्समिशन सिस्टिम आहे. तर, डिझेल इंजिनसोबत केवळ मॅन्यूअल गिअरबॉक्स मिळेल.
-
कंपनीने आतापर्यंत भारतात पहिली इंटरनेट एसयूव्ही एमजी हेक्टर, इलेक्ट्रिक इंटरनेट एसयूव्ही एमजी झेडएस ईव्ही आणि पहिली ऑटोनॉमस (लेव्हल-१) प्रीमियम एसयूव्ही एमजी ग्लॉस्टर या तीन गाड्या लाँच केल्यात. त्यामध्ये आता अजून दोन नव्या SUV चा समावेश झालाय. कंपनीच्या तिन्ही गाड्यांना ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे नवीन एसयूव्हींनाही तसाच प्रतिसाद मिळेल अशी चर्चा आहे.
-
दोन्ही एसयूव्हीच्या किंमती : MG Hector 2021 ची बेसिक एक्स शोरूम किंमत 12.89 लाख रुपये आहे. तर टॉप व्हर्जनची किंमत 18.32 लाख रुपये आहे. दुसरीकडे, 7 सीटर MG Hector Plus ची बेसिक एक्स-शोरुम किंमत 13.34 लाख रुपये आणि टॉप व्हर्जनची किंमत 18.32 लाख रुपये आहे. ( वरील फोटोमध्ये सर्व व्हेरिअंट्स आणि त्याची किंमत बघू शकतात. सर्व फोटो सौजन्य : mgmotor.co.in)

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल