-
मागील काही दिवसांपासून लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या घरात आनंदाचं वातावरण आहे. आनंदाची बातमी म्हणजे लोकसभा अध्यक्षांची लहान मुलगी अंजली बिर्ला आयएएस बनली आहे. (photos:anjalibirla/instagram)
-
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना दोन मुली आहेत. मोठी मुलगी सीए आहे. लहान मुलगी आता UPSC उत्तीर्ण झाली आहे.
-
दहावीत चांगले गुण मिळनही अंजलीने विज्ञान शाखेऐवजी कला शाखेला प्रवेश घेतला होता. तिच्या या निर्णयाचं सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं होतं.
-
महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर अंजलीने आयएएस बनण्याचा निश्चय केला होता. कोटातील सोफिया महाविद्यालयातून अंजलीने १२वी पूर्ण केली.
-
त्यानंतर दिल्लीतील रामजस महाविद्यालयात राज्यशास्त्र विषयात पदवी घेतली. त्यानंतर एक वर्ष दिल्लीत राहून अंजलीने युपीएससी परीक्षेची तयारी पूर्ण केली.
-
अंजलीने पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत यश संपादन केलं. आपल्या या यशाचं श्रेय अंजली मोठी बहिण आकांक्षा हिला देते.
-
आकांक्षाने शिकवलं आणि प्रत्येकवेळी प्रोत्साहित केलं. प्रत्येक वेळी आकांक्षा आपल्यासोबत होती. यूपीएससी परीक्षेच्या मुलाखतीची तयारी करण्यासाठीही खूप मदत केली आणि माझा उत्साह वाढवला, असं अंजली सांगते.
-
प्रत्येक दिवशी १० ते १२ तास परीक्षेची तयारी करायचे, असं अंजली सांगते. अंजलीने परीक्षेसाठी राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध हे दोन विषय घेतले होते.
-
"वडील राजकारणात आहेत, तर आई वैद्यकीय क्षेत्रात आहे. कुटुंबातील प्रत्येकजण कोणत्यातरी क्षेत्रात कार्यरत आहेत. आपल्याला स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं. त्यामुळेच वेगळ्या दृष्टीकोणातून युपीएससीचा पर्याय निवडला, असं अंजली सांगते.
-
अंजलीच्या यशामुळे तिची आई अमिता बिर्ला या खूप आनंदी आहेत. अंजली लहानपणापासूनच उशार आहे. ती प्रत्येक काम पूर्ण करण्यासाठी कष्ट घेते, असं त्या म्हणाल्या.

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या विक्रमी खेळीचं हिटमॅनकडून २ शब्दात कौतुक; रोहित शर्मा पोस्ट शेअर करत म्हणाला…