-
तरुणाईमध्ये लोकप्रिय असलेली टीव्हीएस अपाचे ही कंपनीची फ्लॅगशिप बाइक नवीन वर्षात महाग झालीये. टीव्हीएस मोटर कंपनीने अपाचे या बाइकच्या सर्व व्हेरिअंटच्या किंमतीत 3000 रुपयांपर्यंत वाढ केली आहे. नवीन किंमती तातडीने लागू झाल्या असून कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरही किंमती अपडेट झाल्या आहेत. जाणून घेऊया अपाचेच्या कोणत्या व्हेरिअंटमध्ये किती वाढ झाली :
-
RR 310 : अपाचे RR 310 या बाइकच्या किंमतीत तीन हजार रुपयांची वाढ झाली आहे. परिणामी या बाइकसाठी आता तुम्हाला 2.48 लाख रुपये मोजावे लागतील.
-
RTR 200 4V Dual-Channel : अपाचे RTR 200 4V Dual-Channel या बाइकच्या किंमतीत कंपनीने 2,020 रुपयांची वाढ केलीये. त्यामुळे या बाइकची नवी किंमत 1. 33 लाख रुपये झाली आहे.
-
RTR 200 4V Single : अपाचे RTR 200 4V Single ही बाइकही 2,020 रुपयांनी महाग झाली असून नवीन किंमत 1.27 लाख रुपये झालीये.
-
RTR 160 4V Disc : अपाचे 160 4V Disc ही बाइकही 1,770 रुपयांनी महाग झाली असून आता या बाइकची किंमत एक लाख दहा हजार तीनशे वीस रुपये झालीये.
-
RTR 160 4V Drum : अपाचे RTR 160 4V या व्हेरिअंटच्या किंमतीतही 1,770 रुपयांची वाढ झालीये. आता या बाइकची किंमत एक लाख सात हजार दोनशे सत्तर रुपये झालीये.
-
RTR 180 : अपाचे RTR 180 या ही बाइकही 1,770 रुपयांनी महाग झाली असून आता या बाइकची किंमत एक लाख दहा हजार तीनशे वीस रुपये झालीये. एक लाख आठ हजार दोनशे सत्तर रुपये झालीये.
-
RTR 160 Disc : अपाचे RTR 160 Disc ही बाइकही 1,520 रुपयांनी महागली असून आता या बाइकची नवी किंमत एक लाख पाच हजार सत्तर रुपये झालीये.
-
RTR 160 Drum : अपाचे RTR 160 Drum ही अपाचेची सर्वात स्वस्त फ्लॅगशिप बाइक असून या बाइकच्या किंमतीतही 1,520 रुपयांची वाढ झालीये. त्यामुळे आता या बाइकची नवीन किंमत एक लाख दोन हजार सत्तर रुपये झाली आहे.
-
माहितीसाठी : वरती दिलेल्या सर्व एक्स-शोरुम किंमती आहेत.
Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल