-
Amazon ने भारतात फक्त मोबाइल युजर्ससाठी Amazon Prime Video Mobile Edition सबस्क्रिप्शन प्लॅन लाँच केलाय. यासोबतच भारत जगातील पहिला देश ठरलाय जिथे अॅमेझॉनने ग्राहकांसाठी 'मोबाइल-ओन्ली प्राइम व्हिडिओ प्लॅन'ची सुरूवात केली आहे.
-
Amazon ने हा मोबाइल प्लॅन लाँच करण्यासाठी एअरटेलसोबत भागीदारी केली असून 89 रुपयांपासून या प्लॅनची सुरूवात होते. अॅमेझॉनला टक्कर देणाऱ्या नेटफ्लिक्सचा मोबाइल प्लॅन 199 रुपयांपासून सुरू होतो.
-
89 रुपयांमध्ये एअरटेल युजर्स अॅमेझॉन प्राइम स्ट्रीमिंग सर्व्हिसवरील सर्व चित्रपट आणि वेब सीरिज अॅक्सेस करु शकतात.
-
अॅमेझॉनकडून युजर्सना 30 दिवस फ्री ट्रायलचीही ऑफर आहे. 30 दिवस फ्री ट्रायल संपल्यानंतर युजर्स प्लॅन निवडू शकतात.
-
89 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये युजर्सना एकूण 6GB डेटाही मिळेल. या प्लॅनसाठी 28 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते.
-
फ्री ट्रायलसाठी एअरटेल युजर्सना एअरटेल थँक्स अॅपमधून मोबाइल नंबरद्वारे अॅमेझॉनवर साइनअप करावं लागेल. आज (बुधवार, दि. 13) दुपारी दोन वाजेपासून ही ऑफर उपलब्ध झाली आहे.
-
89 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनशिवाय अॅमेझॉनकडे 299 रुपयांचा प्रीपेड बंडल प्लॅन देखील आहे. यामध्ये प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशन, अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 1.5 जीबी डेटा मिळतो. या प्लॅची व्हॅलिडिटीही 28 दिवस आहे.
-
याशिवाय कंपनीकडे 131 रुपयांचा प्लॅनही आहे. 30 दिवस व्हॅलिडिटी असलेल्या या प्लॅनमध्ये अॅमेझॉन प्राइम मेंबरशिप मिळते. यात प्राइम व्हिडिओचा पूर्ण अॅक्सेस, फ्री फास्ट शिपिंग आणि अनलिमिटेड अॅड-फ्री म्यूझिकची मजा घेता येईल.
-
तर, 349 रुपयांच्या प्रीपेड बंडल प्लॅनमध्ये युजर्सना पूर्ण प्राइम व्हिडिओ अॅक्सेस, फ्री फास्ट शिपिंग आणि अनलिमिटेड अॅड-फ्री म्यूझिकसोबत अॅमझॉन प्राइम मेंबरशिप मिळते. 28 दिवस वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 2 जीबी डेटाही मिळतो.
-
अॅमेझॉनने आणलेले मोबाइल ओन्ली प्लॅन सिंगल युजरसाठीच आहे. म्हणजे एकावेळी फक्त एकाच युजरला या प्लॅनचा फायदा मिळेल, मल्टी युजर अॅक्सेस मिळणार नाही. या प्लॅनमध्ये एअरटेल युजर्स अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ SD क्वॉलिटीमध्ये बघू शकतात. याशिवाय प्राइम व्हिडिओ मेंबरशिपसाठी कंपनी भारतात युजर्सना आधीपासून 129 रुपयांचा मासिक प्लॅन आणि 999 रुपयांचा वार्षिक प्लॅनही ऑफर करते.
बापरे! भरधाव ट्रकमधला पत्रा उडाला; तरुणाचं डोकं एकीकडे अन् शरीर एकीकडे, अपघाताचा काळीज पिळवटून टाकणारा VIDEO समोर