-
टाटा मोटर्सने आपली फ्लॅगशिप एसयूव्ही Tata Safari वरुन अखेर मंगळवारी, प्रजासत्ताक दिनी पडदा हटवला. पुण्यातील प्लांटमध्ये या एसयूव्हीचं प्रोडक्शन सुरू आहे. आता लवकरच टाटाची ही लोकप्रिय एसयूव्ही नव्या अवतारात पुन्हा एकदा भारतीय मार्केटमध्ये धुमाकूळ घाण्यासाठी सज्ज झालीये. सफारी हा टाटाचा एक मजबूत आणि प्रतिष्ठित ब्रँड असून देशातील ग्राहकांनी दोन दशकांहून अधिक काळ या एसयूव्हीला पसंती दिली आहे.
-
नवीन सात आसनी टाटा सफारी एकप्रकारे 'टाटा हॅरियर'चं नवीन व्हर्जन आहे, असंही म्हटलं जातंय. 4 फेब्रुवारीपासून कंपनी सफारीसाठी बूकिंग घ्यायला सुरूवात करेल असं जाहीर करण्यात आलंय.
-
नवीन टाटा सफारी सहा विविध व्हेरिअंट्समध्ये लाँच केली जाणार आहे. यात XE, XM, XT, XT+, XZ, XZ+ या सहा व्हेरिअंट्सचा समावेश असेल.
-
टाटाची ही आयकॉनिक एसयूव्ही आहे. याआधी ही कार Tata Gravitas नावाने ओळखली जात होती. ही कार कंपनीने पहिल्यांदा ऑटो एक्स्पो 2020 मध्ये आणली होती.
-
इंजिन : नवीन टाटा सफारीत 2.0 लिटर, 4-सिलिंडर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन मिळेल. हे इंजिन 170 BHP पॉवर आणि 350 Nm टॉर्क निर्माण करतं. यासोबत 6-स्पीड मॅन्युअल किंवा 6-स्पीड ऑटोमेटिक गिअरबॉक्स असेल. याशिवाय इको, सिटी आणि स्पोर्ट असे तीन ड्रायव्हिंग मोड असतील. तसेच, तीन ESP टेरेन रिस्पॉन्स मोड- (नॉर्मल, रफ आणि वेट Normal, Tough and Wet) देखील या एसयूव्हीमध्ये आहेत.
-
या एसयूव्हीचा नवीन अवतार अधिक दमदार आहे. नवीन सफारीची रचना, कार्यक्षमता, मल्टी टास्किंग, सेवा आणि दीर्घकाळ टिकणारी डेव्हलपमेंट क्वालिटी ही वैशिष्ट्ये या एसयूव्हीला पूर्वीपेक्षा अधिक दमदार बनवतात.
-
नवीन Tata Safari मध्ये कंपनीने “OMEGARC” (Optimal Modular Efficient Global Advanced Architecture)प्लॅटफॉर्मचा वापर केलाय. जो लँड रोव्हर च्या D8 प्लॅटफॉर्मपासून घेण्यात आला आहे.
-
टाटाच्या नवीन सफारीची इंटिरिअर थीम Oyster White रंगात असून कंपनी यासोबत Ash Wood डॅशबोर्डही देत आहे. तसेच कंपनीने व्हील आणि फ्रंटसाईडवर क्रोम फिनिश लूक दिला आहे.
-
नवीन सफारीत नवीन एक्सटिरियर पेंट पर्याय, नवीन अलॉय व्हील्स, आतल्या बाजूला सिग्नेचर-स्टाईल डुअल-टोन डॅशबोर्ड, तीन-स्पोक स्टिअरिंग व्हील्स, अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कार-प्लेसह 8.8 इंचांची फ्लोटिंग इन्फोटेन्मेंट सिस्टिम, व्हॉईस रेकग्नायजेशन, 7-इंचाचा इंस्ट्रूमेंट पॅनल असेल. याशिवाय गाडीमध्ये तपकिरी रंगाची लेदर सीट आणि जेबीएल स्पीकर्सही असतील.
-
किंमत किती? : टाटा मोटर्सने प्रजासत्ताक दिनी नवीन टाटा सफारीवरुन पडदा हटवला असून 4 फेब्रुवारीपासून सफारीसाठी बूकिंग घेण्यास सुरूवात करणार असल्याची घोषणा केली आहे. भारताच्या ऑटो मार्केटमध्ये टाटा सफारीची टक्कर नवीन जनरेशन Mahindra XUV500, 7 सीटर Hyundai Creta, MG Hector Plus, Toyota Innova Crysta यांसारख्या एसयूव्हींसोबत असेल. कंपनीने या एसयूव्हीची किंमत किती असेल याबाबत अद्याप माहिती दिलेली नाही, पण 15 ते 24 लाख रुपयांदरम्यान या 7 सीटर एसयूव्हीची एक्स-शोरुम किंमत असण्याची दाट शक्यता आहे.

कपलकडून चुकून ओयो रूमचा दरवाजा राहिला उघडा, मेट्रो स्थानकावरून लोक ओरडले, “भावा…” पाहा VIDEO