-
नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात टॉप-10 सर्वाधिक विक्री झालेल्या कारची लिस्ट समोर आली आहे. अपेक्षेप्रमाणे नवीन वर्षात मारुती सुझुकीच्या गाड्यांचा दबदबा बघायला मिळाला. पण त्यासोबतच ह्युंडाईच्या गाड्यांनाही भारतीय ग्राहकांचा चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे. टॉप १० मध्ये ह्युंडाईच्या चार कार आल्या आहेत. जाणून घेऊया जानेवारी महिन्यातील टॉप-10 बेस्ट सेलिंग कार आणि किती झाली विक्री. याशिवाय गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात झालेल्या विक्रीच्या आकडेवारीचीही तुलना करुयात :-
-
नंबर 10- Maruti Suzuki Brezza : जानेवारी 2021 मध्ये 10 हजार 623 ब्रेझा कारची विक्री झाली आहे. तर, गेल्या वर्षी याच महिन्यात (जानेवारी 2020) 10 हजार 134 ब्रेझा कार विकल्या होत्या. म्हणजे ब्रेझाची विक्री जवळपास पाच टक्क्यांनी वाढली आहे.
-
नंबर 9- Hyundai Grand i10 : जानेवारी 2021 मध्ये 10 हजार 865 ह्युंडाई आय10 या कारची विक्री झाली. तर, जानेवारी 2020 मध्ये फक्त 8 हजार 774 कारची विक्री झाली होती. ह्युंडाइच्या या कारच्याही विक्रीत वाढ झालीये.
-
नंबर 8- Maruti Suzuki Eeco : जानेवारी 2021 मध्ये 11,680 इको कारची विक्री झाली आहे. तर, गेल्या वर्षी याच महिन्यात 12 हजार 324 युनिट्सची विक्री झाली होती. म्हणजे इकोच्या विक्रीत तुलनेने घट झाली आहे.
-
नंबर 7- Hyundai Venue : जानेवारी 2021 मध्ये 11 हजार 779 व्हेन्यू कार विकल्या, तर जानेवारी 2020 मध्ये अवघ्या 6 हजार 733 युनिट्सची विक्री झाली होती. म्हणजेच व्हेन्यूच्या विक्रीतही मोठी वाढ झाली आहे.
-
नंबर 6- Hyundai Creta : जानेवारी 2021 मध्ये 12 हजार 284 क्रेटा विकल्या गेल्या. तर, जानेवारी 2020 मध्ये फक्त 6 हजार 900 क्रेटाची विक्री झाली होती. म्हणजेच क्रेटाच्या विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून ही कार भारतीयांच्या चांगलीच पसंतीस पडल्याचं दिसत आहे.
-
नंबर 5- Maruti Suzuki Dzire : जानेवारी 2021 मध्ये 15 हजार 125 डिझायर कारची विक्री झाली. तर, जानेवारीमध्ये हा आकडा 22 हजार 406 इतका होता. म्हणजे डिझायरच्या विक्रीमध्ये मोठी घट झाल्याचं दिसत आहे.
-
नंबर 4- Maruti Suzuki Baleno : जानेवारी 2021 मध्ये 16 हजार 648 बलेनो कारची विक्री झाली. तर, जानेवारी 2020 मध्ये 20 हजार 485 बलेनो कार विकल्या होत्या. म्हणजेच बलेनोच्या विक्रीमध्ये घट झाली आहे.
-
नंबर 3- Maruti Suzuki Wagon R : जानेवारी 2021 मध्ये 17 हजार 165 वॅगनआर कारची विक्री झाली. तर, जानेवारी 2020 मध्ये 15 हजार 232 वॅगनआर विकल्या होत्या. म्हणजेच वॅगनआरच्या विक्रीत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.
-
नंबर 2- Maruti Suzuki Swift : जानेवारी 2021 मध्ये 17 हजार 180 स्विफ्ट कारची विक्री झाली. तर, जानेवारी 2020 मध्ये 19 हजार 981 युनिट्सची विक्री झाली होती. म्हणजेच स्विफ्टच्या विक्रीतही घट नोंदवण्यात आली.
-
नंबर 1- Maruti Suzuki Alto : जानेवारी 2021 मध्ये 18 हजार 260 अल्टो कारची विक्री झाली. तर, गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात 18 हजार 914 युनिट्सची विक्री झाली होती. म्हणजेच अल्टोच्या विक्रीत थोडीफार घट झाली आहे. पण सर्वाधिक विक्री झालेल्या गाड्यांमध्ये अल्टो पहिल्या क्रमांकावर आहे.

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…