-
जर तुम्ही चांगला 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे.
-
Xiaomi कंपनीचा फ्ल्रॅगशिप स्मार्टफोन आता पाच हजार रुपयांनी स्वस्त झाला आहे. कंपनीने108 मेगापिक्सेल कॅमेरा असलेल्या आपल्या Mi 10 5G स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली आहे.
-
Mi 10 5G मध्ये चार रिअर कॅमेऱ्यांचा सेटअप, 5G सपोर्ट, 3D कर्व्ह्ड डिस्प्ले , क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर आणि वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट असे शानदार फिचर्स आहेत.
-
रॅम :- Mi 10 5G भारतात 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज, व 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज अशा दोन व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे.
-
डिस्प्ले :- होल-पंच कटआउट आणि कर्व्ह्ड अॅमोलेड पॅनलसह या फोनमध्ये 6.67-इंचाचा फुल-एचडी+ (1080 x 2340 पिक्सल) डिस्प्ले आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 865 चिपसेटचा वापर करण्यात आला आहे.
-
ड्युअल-सिम सपोर्ट :- ड्युअल-सिम (नॅनो) सपोर्ट असलेला Mi 10 5G हा फोन अँड्रॉइड 10 वर आधारित MIUI 11 वर कार्यरत असतो.
-
कॅमेरा :- फोनच्या मागील बाजूला चार कॅमेऱ्यांचा सेटअप आहे. त्यातील मुख्य कॅमेरा 108 मेगापिक्सलचा आहे. कॅमेरा 8K व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो. तसेच यात शूटस्टेडी मोडही आहे. याशिवाय दुसरा कमेरा 13 मेगापिक्सल वाइड-अँगल लेन्स, तर अन्य दोन कॅमेरे 2 मेगापिक्सलचे आहेत.
-
सेल्फी कॅमेरा आणि बॅटरी :- याशिवाय सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही आहे. तसेच Mi 10 मध्ये 4,780 एमएएच क्षमतेची फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली बॅटरी आहे.
-
टक्कर कोणाशी? :- किंमतीत कपात झाल्याने शाओमीच्या Mi 10 या फोनची भारतीय स्मार्टफोन बाजारात OnePlus 8, Realme X50 Pro 5G आणि iQoo 3 या 5G सपोर्ट असलेल्या स्मार्टफोनला तगडं आव्हान मिळेल.
-
नवीन किंमत :- किंमतीच पाच हजार रुपयांची कपात झाल्याने आता Xiaomi Mi 10 च्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजची किंमत 44 हजार 900 रुपये झाली आहे. तर, 12जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 49 हजार 999 रुपये झाली आहे.
VIDEO: “जेव्हा नवरीला मनासारखा नवरा भेटतो” लग्नात नवरीचा भन्नाट डान्स; नवरदेव लाजून लाल तर सासूबाईंची रिअॅक्शनही बघाच