-
अमावास्या दशमस्थानात होत आहे. चलबिचल अवस्था कमी करून एकाच मतावर ठाम राहण्याचा प्रयत्न करा. चर राशीत ग्रहांचे वास्तव्य असताना कामातील कसर सोडू नका. व्यावहारिक गोष्टींकडे लक्ष द्या. अटीतटीचा सामना कमी होईल. व्यापार उद्योगात प्रगतिशील बदल घडेल. निश्चित केलेली कार्यपद्धती उशिरा का होईना फायदा मिळवून देणारी ठरेल. नोकरदार व्यक्तींनी वरिष्ठांशी हुज्जत न घालता कामाकडे लक्ष द्या. बोलून कोणतीही गोष्ट साध्य होणार नाही हे लक्षात ठेवा. पैशांचे व्यवहार मात्र जपून करा. सार्वजनिक क्षेत्रात वेळेला महत्त्व द्या. सासुरवाडीकडील लोकांचा गैरसमज होऊ देऊ नका. नातेवाईकांशी होणारी चर्चा चांगला मार्ग काढणारी ठरेल. आरोग्य उत्तम राहील. शुभ दिनांक : ८, ९ महिलांसाठी : जुन्या मैत्रिणींशी संवाद होईल.
-
अमावास्या तुमच्या भाग्यस्थानात होत आहे. कोणत्या गोष्टीची वाट बघत न बसता स्वत: तत्पर राहा. प्रत्येक गोष्ट तुम्हाला साध्य करावयाची आहे. हे विसरून चालणार नाही. व्यावहारिकदृष्ट्या पळापळ होणार नाही, यासाठी तुम्ही केलेले नियोजन यशस्वी होईल. मागील काही दिवसांपेक्षा सध्याचा सप्ताह बऱ्यापैकी अनुकूल वाटेल. नोकरीमध्ये महत्त्वाच्या कामात अपेक्षित बदल घडतील. इतरांचा संदर्भ न घेता केलेले काम अचूक असेल. वरिष्ठांचे सहकार्य उत्तम लाभेल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. बचतीत वाढ होईल. राजकीय क्षेत्रात इतरांना दिलेला शब्द पूर्ण करून दाखवाल. कुटुंबात होणारे रुसवे-फुगवे तात्पुरत्या स्वरूपाचे ठेवा. विनाकारण वेगळी वाट काढू नका. पथ्य-पाणी सांभाळले तर आरोग्य उत्तम राहील. शुभ दिनांक : १०, १२ महिलांसाठी : जबाबदारी वाढल्याने मनोरंजनासाठी वेळ मिळणार नाही.
-
अमावास्या तुमच्या अष्टमस्थानात होत आहे. तेव्हा उचलली जीभ लावली टाळ्याला, हे मात्र कटाक्षाने पाळा. कोणतीही कृती करण्यापूर्वी मागचा पुढचा विचार करा. व्यावसायिकदृष्ट्या बदल होतील. त्यामुळे दोलायमान स्थिती निर्माण होईल. गोष्टी सोप्या नसल्या तरी अवघडही नाहीत. फायद्यासाठी विनाकारण धाडस वाढवू नका. इतरांनी सांगितले म्हणून गुंतवणूक करणे टाळा. नोकरदार व्यक्तीने झालेली अस्वस्थता कमी करा. लवकर असू द्या किंवा उशिरा तुम्हालाच कामे वेळेत पूर्ण करावे लागणार आहेत. तेव्हा मन शांत ठेवा. कामाकडे लक्ष केंद्रित करा. कर्ज व्यवहार जपून करा. आवाक्याबाहेरची रक्कम इतरांकडून घेऊ नका. सध्या राजकारणात न पडलेले चांगले राहील. आध्यात्मिक गोष्टीत मन रमवण्याचा प्रयत्न राहू द्या. जुन्या व्याधींकडे वेळीच लक्ष द्या. शुभ दिनांक : ८, ९ महिलांसाठी : इतरांशी तुलना करणे टाळा.
-
सप्तमस्थानात अमावास्या होत आहे. स्पर्धात्मक गोष्टीत गुंतण्याचा विचार टाळा. अनेक वेळी मनाविरुद्ध निर्णय घ्यावे लागत होते, तरीसुद्धा आता तुम्ही डगमगत नव्हता. अनुकूल सप्ताह करण्यासाठी थोडा अवधी घ्या. कारखानदार व मोठे उद्योगपती यांनी कोणताही व्यवहार करताना आर्थिक बाबींचा विचार करा. समयसूचकता बाळगून निर्णय घेणे योग्य ठरेल. नोकरदार व्यक्तींना मिळालेल्या सूचनांचे पालन करा. कामाव्यतिरिक्त इतर चर्चा करणे टाळा. आर्थिक नियोजन पक्के असू द्या. सामाजिक क्षेत्रात नवे बदल करू नका. कामापुरत्या जवळ करणाऱ्या मित्रांपासून लांब राहा. कुटुंबातील सदस्यांशी संवाद करताना वाद होणार नाहीत याची काळजी घ्या, स्वत:साठी वेळ काढा. प्रकृतीचे स्वास्थ्य सांभाळा. शुभ दिनांक : ७, १० महिलांसाठी : अडचणींवर मात करायला शिका.
-
षष्ठम स्थानातून अमावास्या होत आहे. जिभेवरती नियंत्रण ठेवा. इतरांच्या कोणत्याही भानगडीत पडू नका. आळस झटकून कामाला लागा. धरसोड वृत्ती कमी करा. व्यवसायाच्या ठिकाणी उमेद सोडू नका. भावनिक गोष्टींवर निर्णय घेणे टाळा. व्यवहाराला महत्त्व देऊन प्रगती साधा. नियमित व वेळेवर कामकाजाचे नियोजन करा. नेहमीप्रमाणेच धडपड चालू राहील. एक हातचा राखून ठेवण्याची सवय लावून घ्या. नोकरीच्या ठिकाणी गाफील राहून चालणार नाही. शासकीय नोकरीतील व्यक्तींनी स्वत:च्या भल्यासाठी आपल्या प्रतिक्रियांबद्दल वरिष्ठांना बोलणे टाळा. खर्चाच्या बाबींवर योग्य नियंत्रण ठेवल्यास पैशांची अडचण वाटणार नाही. सामाजिक क्षेत्रातील नियमांचे पालन करीत निर्णय द्या. जवळच्या पाहुणे मंडळींकडून येणाऱ्या प्रतिक्रियांवर जास्त विचार न करणे हिताचे राहील. आरोग्याची काळजी घ्या. शुभ दिनांक : ८, ९ महिलांसाठी : मनाला समाधान मिळेल अशाच गोष्टी करा.
-
अमावास्या पंचम स्थानातून होत आहे. अनोळख्या व्यक्तींपासून लांब राहा. सुधारित गोष्टींचा पाठपुरावा करून योग्य समतोल साधा. व्यवसायातील स्थिरता मनाला उभारी मिळवून देईल. सतत येणारे दडपण कमी होईल. देवाणघेवाण सुरळीत चालू राहील. बारकावा साधून पर्यायी व्यवस्था स्वीकारा. नोकरदार व्यक्तींना मोठा दिलासा मिळेल. नवीन कल्पना प्रत्यक्षात उतरवाल. वरिष्ठांचे सहकार्य उत्तम मिळेल, त्यामुळे कामातील उत्साह वाढेल. आर्थिक बाजू भक्कम राहील. सार्वजनिक ठिकाणी इतरांची लुडबुड कमी होईल. मित्रांसाठी वेळ द्याल. मुलांसाठी ठरवलेले नियोजन बदलू नका. घरगुती वातावरण चांगले असेल. उपासना फलद्रूप होईल. शारीरिकदृष्ट्या प्रकृती ठणठणीत राहील. शुभ दिनांक : ७, १० महिलांसाठी : गरजवंतांची गरज पुरवणे हे तत्त्व अंगीकृत कराल.
-
चतुर्थ स्थानातून अमावास्या होत आहे. बोलणे आदरयुक्त ठेवा. गप्पागोष्टी करताना वाद टाळा व अमावास्याचा कालावधी सुखकर करा. व्यापारी क्षेत्रात सुधारणा घडतील. काही प्रमाणात अनपेक्षित उत्पादन वाढल्याने त्याची तरतूद करून ठेवावी लागेल. थोडा धावपळीचा कालावधी असला, तरी श्रमाचे फळ मिळणार आहे. नोकरदार व्यक्तींनी कामाच्या ठिकाणी स्वत: सतर्क राहणे महत्त्वाचे राहील. कामाच्या नोंदी ज्या-त्या वेळी करण्यात हलगर्जीपणा टाळा. महत्त्वाच्या बाबी लक्षात घ्या. कोणताही गोंधळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. आर्थिक दृष्ट्या विचार करा. करमणुकीसारख्या गोष्टींवर खर्च करू नका. मित्रपरिवाराची मदत मिळेल. घरातील सदस्यांच्या तब्येतीची काळजी घ्या. आरोग्य उत्तम राहील. शुभ दिनांक : ९, १० महिलांसाठी : दुसऱ्यांना समजून घेण्यात तुमच्या मनाचा मोठेपणा असेल.
-
नकळत घडणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा व अमावास्याचे सूर जुळवून घ्या. व्यवसायात होणारे आयत्या वेळी बदल लक्षात घ्यावे लागतील. आतापर्यंत होणारी गैरसोय कमी झाल्याने पुढील गोष्टींचे नियोजन करणे सोपे होईल. महत्त्वाच्या मुद्द्यांवर विचारविनिमय करून प्रस्ताव स्वीकारा. नोकरीचे स्वास्थ्य कायम टिकून ठेवण्यासाठी मानसिकता बदला. नकारार्थी भूमिका न ठेवता सकारात्मक ध्येय ठेवा. जबाबदारीने केलेल्या कामात मोठे यश मिळेल. पैशांच्या बाबतीत समाधानकारक स्थिती निर्माण होईल. राजकीय घडामोडीतील सुधारणा होतील. भावंडांच्या अडचणींकडे लक्ष द्यावे लागेल. कोणतेही निर्णय घेण्यापूर्वी घरातील सदस्यांना विश्वासात घ्या. जोडीदाराशी मतभेद टाळा. धार्मिक गोष्टींसाठी वेळ द्यावा लागेल. मानसिक व शारीरिक आरोग्य जपा. शुभ दिनांक : ७, १२ महिलांसाठी : कामात मग्न राहण्याचा प्रयत्न करा.
-
अमावास्या कुटुंब स्थानात होत आहे. मनावरील मळभ दूर करा. ज्याच्यातून काही समाधान नाही, अशा विचारात गुंतू नका. संवादाची भूमिका गोडीची असू द्या. व्यावसायिक बाबींचा भार इतरांवर टाकू नका. स्वत:ची जबाबदारी स्वत: पार पाडा. अनेक बदल स्वीकारून चालणे यशस्वी ठरेल. शेती-फळबागा व्यवसायालाही मोठा दिलासा मिळेल. नोकरीमधील प्रतिकूल काळ कमी होईल. जसजसे कामाचे व्याप वाढेल, अशीच तासिका ठरवा. ज्येष्ठांची कृपा राहील. आगामी काळासाठी ठरवलेल्या तरतुदी अमलात आणाव्या लागतील. आर्थिक बाबतीत मजल मारता आली तरीही खर्चाची दोरी तुमच्याच हातात आहे. सार्वजनिक ठिकाणी विकासाकडे लक्ष द्या. कुटुंबात कलह वाढणार नाही, याची दक्षता घ्या. खाण्यापिण्याचे पथ्य पाणी सांभाळा. शुभ दिनांक : ८, १० महिलांसाठी : खर्चावरती नियंत्रण ठेवा.
-
मानसिक आरोग्य बिघडणार नाही, याची अमावास्या कालावधीत काळजी घ्या. सध्या भूतकाळापेक्षा वर्तमानकाळाला महत्त्व द्या. मिळालेल्या वेळेचा उपयोग चांगल्या संधींसाठी करून घ्या. व्यवसायात सुधारणा करून चांगली मजल मारता येईल. बदलत्या घडामोडींनुसार निर्णय घ्यावे लागतील. छोट्या-मोठ्या उद्योग-व्यवसायांना कलाटणी मिळेल. नोकरदार व्यक्तींनीअधिकारी व्यक्तींच्या सल्ल्याशिवाय कोणतेही पाऊल उचलू नये. नव्या नोकरीचा ध्यास सध्या तरी धरू नका. आहे त्यात समाधान माना. आर्थिक गोष्टी सुधारल्या तरी अंदाजे खर्च करणे योग्य राहणार नाही. मित्रांवरती अवलंबून कोणतीही गोष्ट करणे टाळा. राजकीय क्षेत्रात तापलेल्या वातावरणात शांत राहा. कौटुंबिक जबाबदारी पार पाडा. शारीरिकदृष्ट्या योग्य साधनेला महत्त्व द्या. शुभ दिनांक : ७, १२ महिलांसाठी : मनातील शंका-कुशंकांना थारा देऊ नका.
व्ययस्थानातून अमावास्या होत आहे. या कालावधीत मनाची झालेली भरकट थांबवा. उधार-उसणवारीचे प्रसंग येणार नाहीत, याची काळजी घ्या. कोणत्याही कामाला सुरुवात करण्यापूर्वी त्याचे वेळापत्रक ठरवून मगच हालचाली करा. व्यावसायिक घडामोडीत बदल होतील. हे बदल तुम्ही तुमच्या आगामी काळासाठी उपयोगी पडतील, त्यामुळे दृष्टिकोन विस्तारेल. कामात कसूर न ठेवता केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. नोकरदार व्यक्तींना पूर्वार्धात उत्साह वाटणार नाही. न डगमगता मन स्थिर ठेवावे. खर्च वाढले तरी आर्थिक स्थिती ढासळणार नाही. राजकीय क्षेत्रात प्रतिस्पर्धींवर मात करण्याची ही वेळ नाही. नव्या ओळखीचा फायदा होईल. धार्मिक गोष्टींची आवड राहील. आरोग्य उत्तम असेल. शुभ दिनांक : ८, ९ महिलांसाठी : केलेल्या कामाचे फळ मिळेल. -
अमावास्या काळात आवश्यकता असेल, त्याच गोष्टींचा पाठपुरावा करा. ओढून-ताणून कोणतीही कृती करणे टाळा. महत्त्वाच्या बाबी लक्षात घ्या. व्यापारी व्यवसायाचे चित्रीकरण बदललेले असेल. अस्थिर परिस्थितीचा सामना कमी होईल. उत्पादनाचे नवे पैलू वाढलेले असतील. ठरवलेल्या गोष्टी सुरळीत घडतील. ज्यांना नोकरीतील अनिश्चितता वाटत होती, ती नोकरी खात्रीशीर वाटू लागेल. त्यामुळे मनाला मानसिक समाधान लाभेल. अधिकारी व्यक्तींनी दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडाल. आर्थिक पेचप्रसंग निर्माण होणार नाहीत. राजकीय क्षेत्रात प्रतिष्ठा उंचावेल. वरिष्ठांची कृपा राहील. मित्रमंडळींना वेळप्रसंगी मदत कराल. नातेवाईकांविषयी असलेला सलोखा दृढ होईल. धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन कराल. प्रकृती ठणठणीत राहील. शुभ दिनांक : ७, १० महिलांसाठी : उत्साह कायम टिकून राहील.

Pahalgam Terror Attack : गोळीबार सुरू होताच झाडावर चढून केलं संपूर्ण हल्ल्याचं रेकॉर्डिंग; स्थानिक व्हिडीओग्राफर बनला NIAचा प्रमुख साक्षीदार