-
पोको (POCO) कंपनीने गेल्या आठवड्यात (दि.२) भारतात आपला नवीन ‘बजेट’ स्मार्टफोन Poco M3 लाँच केला. कमी किंमतीत शानदार फिचर्स असलेला हा जबरदस्त स्मार्टफोन आज (दि.९) पहिल्यांदाच सेलमध्ये खरेदी करण्याची संधी आहे.
-
6जीबी रॅम+64जीबी इंटरनल स्टोरेज आणि 6जीबी+128जीबी इंटरनल स्टोरेज अशा दोन व्हेरिअंटमध्ये हा फोन लाँच करण्यात आला आहे. आज (दि.९) दुपारी १२ वाजेपासून हा फोन फ्लिपकार्टच्या वेबसाइटवर सेलमध्ये उपलब्ध असेल.
-
सेलमध्ये फोनच्या खरेदीवर अनेक आकर्षक ऑफरही आहेत. यानुसार ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डवर १००० हजार रुपयांपर्यंत सवलत मिळू शकते. तसेच, फ्लिपकार्ट अँक्सिस बँक क्रेडिट कार्डवरही पाच टक्के कॅशबॅकची ऑफर आहे.
-
याशिवाय, फ्लिपकार्टवरील पहिल्या सेलमध्ये या फोनवर दरमहा 1,834 रुपये नो-कॉस्ट ईएमआयचा पर्याय आणि जुन्या फोनच्या बदल्यात 10 हजार 350 रुपयांपर्यंत एक्स्चेंज ऑफरही आहे.
-
पोको M3 फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स :- या फोनमध्ये 6.53 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले असून डिस्प्लेला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शनही आहे. 6जीबी रॅम आणि 128जीबीपर्यंत इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 662 प्रोसेसर आहे.
-
कॅमेरा :- फोटोग्राफीसाठी पोको M3 फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यातील 48 मेगापिक्सेलच्या प्रायमरी सेन्सरसोबत एक 2 मेगापिक्सेलचा मॅक्रो लेन्स आणि एक 2 मेगापिक्सेलचा डेप्थ सेन्सर आहे.
-
सेल्फी कॅमेरा : याशिवाय सेल्फीसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा कॅमेराही मिळेल.
-
बॅटरी :- 512जीबीपर्यंत माइक्रो एसडी कार्डचा सपोर्ट असलेल्या या फोनमध्ये कंपनीने 18W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली 6000mAh क्षमतेची दमदार बॅटरी दिली आहे.
-
कनेक्टिव्हिटी :- कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये IR ब्लास्टर, 4G VoLTE , वाय-फायशिवाय अन्य सर्व स्टँडर्ड पर्याय आहेत.
-
पोको M3 किंमत :- 6जीबी रॅम+64जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 10 हजार 999 रुपये आहे. तर, 6जीबी+128जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 11 हजार 999 रुपये आहे.
Vaibhav Suryavanshi: १४ वर्षीय वैभवने रचला इतिहास! ३५ चेंडूत झळकावलं वादळी शतक