-
MG Motors ने भारतात आपली इलेक्ट्रिक कार 2021 ZS EV लाँच केली आहे. कंपनीने या वर्षाची सुरूवात Hector च्या फेसलिफ्ट मॉडेलने केली होती, आणि आता कंपनीने ZS EV फेसलिफ्ट मॉडेलमध्ये लाँच केली आहे. ही भारतातील पहिली पूर्ण इलेक्ट्रिक इंटरनेट एसयूव्ही असल्याचा कंपनीने दावा केला आहे.
-
भारतातील पहिली पूर्ण इलेक्ट्रिक इंटरनेट एसयूव्ही असल्याचा कंपनीने दावा केला असून या कारमध्ये अनेक नावीन्यपूर्ण सुविधा आहेत. यात पॅनोरमिक सनरुफ, 17 इंच डायमंड कट अॅलॉल व्हील्स, 2.5 पीएम फिल्टर इत्यादींचा समावेश आहे.
-
भारतीय बाजारात नवीन MG ZS EV ची टक्कर Tata Nexon EV आणि ह्युंडाई कोना यांसारख्या कारसोबत असेल. भारतात टाटा निक्सॉन ईवी ही कार बरीच लोकप्रिय आहे. त्यामुळे एमजीच्या या नवीन कारला चांगलं आव्हान मिळण्य़ाची शक्यता आहे.
-
देशभरात चार्जिंग इकोसिस्टिमचा विस्तार करत झेडएस ईव्ही 2021 ही आता देशातल्या 31 शहरांमध्ये बुकिंगसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. जानेवारी 2020 मध्ये सुरुवातीला ही कार 5 शहरांमध्ये लॉन्च करण्यात आली होती.
-
एमजी झेडएस ईव्ही ही 143 पीएस पॉवर आणि 350 एनएम टॉर्कसह येते तसेच ती 0 ते 100 kmph अंतर 8.5 सेकंदात गाठू शकते.
-
कंपनीने या कारमध्ये 44.5 kWh हाय टेक बॅटरीचा वापर केला आहे. फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली ही बॅटरी एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर तब्बल 419 किमीचं अंतर कापते.
-
झेडएस ईव्ही सोबत एमजीने आपल्या ग्राहकांना ५- वे चार्जिंग इकोसिस्टिम दिले असून घर किंवा ऑफिसमध्ये मोफत एसी फास्ट चार्जर, पोर्टेबल इन-कार चार्जिंग केबल, डीलरशिपसाठी डीसी सुपरफास्ट चार्जिंग स्टेशन, २४x७ चार्ज-ऑन-द-गो सुविधा (५ शहरांमध्ये) व सॅटेलाइट शहर तसेच पर्यटन केंद्रांमध्ये चार्जिंग स्टेशन आहेत.
-
कंपनीने ‘इको ट्री चॅलेंज’ देखील आणले असून याअंतर्गत झेडएस ईव्ही मालक पर्यावरणीय उपक्रमात सहभागी होऊ शकतात. याद्वारे त्यांची CO2 सेव्हिंग आणि रिअल टाइममध्ये राष्ट्रीय क्रमवारी तपासू शकतात.
-
एमजी झेडएस ईव्ही 2021 ही एमजी ईशील्ड सोबत संरक्षित असून, याद्वारे कारनिर्माता 8 वर्षांसाठी अमर्याद किमीकरिता 5 वर्षांची मोफत वॉरंटी/1.5 लाख किमी वॉरंटी बॅटरीपॅक सिस्टिमसाठी, 5 वर्षांसाठी राउंड-द-क्लॉक रोडसाइड असिस्टन्स आणि 5 लेबर-फ्री सर्व्हिसेस दिल्या जातात.
-
किंमत : MG ZS EV ही SUV 'एक्साइट' आणि 'एक्सक्लुझिव्ह' अशा दोन प्रकारात उपलब्ध आहे. एसयूव्हीच्या बेसिक अर्थात एक्साइट व्हेरिअंटची एक्स-शोरुम किंमत 20 लाख 99 हजार 800 रुपये आहे. तर, Exclusive व्हेरिअंटची किंमत 24 लाख 18 हजार रुपये आहे.

Pahalgam Terror Attack : गोळीबार सुरू होताच झाडावर चढून केलं संपूर्ण हल्ल्याचं रेकॉर्डिंग; स्थानिक व्हिडीओग्राफर बनला NIAचा प्रमुख साक्षीदार