-
'क्लासिक लीजंड्स' कंपनीने भारतातील आपली लोकप्रिय बाइक Jawa forty two एका नव्या अवतारात लाँच केली आहे. कंपनीने नव्या वर्षासाठी नवीन मॉडेल अर्थात 2021 Jawa forty two लाँच केली आहे.
-
२०१८ मध्ये भारतीय बाजारात एंट्री घेतेवेळी कंपनीने सर्वप्रथम Jawa forty two ही बाइक आणली होती. आता नवीन अपडेटमध्ये कंपनीने बाइकमध्ये काही बदल केले आहेत.
-
कंपनीने बाइकमध्ये काही मॅकेनिकल बदल केलेत, याशिवाय अन्य काही छोट्या-मोठ्या बदलांसह नवीन आकर्षक रंगांमध्ये आता या बाइकची भारतात विक्री होईल.
-
ओरियन रेड, सीरियस व्हाइट, ऑलस्टार ब्लॅक (Orion Red, Sirius White, AllStar Black) अशा तीन नवीन रंगांचे पर्याय या बाइकसाठी आता असतील. याशिवाय अपडेटेड नवीन अॅलॉय व्हील्स विथ ट्युबलेस टायर्सही आहेत.
-
आजपासून अर्थात १२ फेब्रुवारीपासून अपडेटेड Jawa forty two देशभऱातील सर्व डिलरशीप्समध्ये विक्रीसाठीही उपलब्ध झाली असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. नवीन जावा फोर्टी टू ही बाइक म्हणजे 2.1 अपडेट असल्याचं कंपनीने म्हटलंय.
-
नवीन जावा फोर्टी टूच्या पूर्ण रेंजमध्ये फ्लाय-स्क्रीन आणि अपडेटेड हेडलॅम्प ग्रिल मिळतील. याशिवाय ग्राहकांसमोर त्यांच्या आवडीच्या अॅक्सेसीरिज खरेदी करण्याचा पर्यायही मिळेल.
-
1369mm इतका बाइकचा व्हील बेस आहे. बाइकमध्ये झालेल्या काही मॅकेनिकल आणि अन्य बदलांमुळे रायडिंगचा अनुभव आधीपेक्षा अजून चांगला मिळेल.
-
यासोबतच नवीन बाइकमध्ये सस्पेन्शन रिट्यून केले आहेत, त्यामुळे बाइकची हँडलिंग आणि क्लिअरन्स अधिक उत्तम झाली आहे.
-
इंजिन : अपडेटेड 2021 Jawa forty two मध्ये कंपनीने आधीप्रमाणेच 293 cc लिक्विड-कूल्ड आणि फ्युअल इंजेक्टेड इंजिन (293 cc liquid-cooled and fuel-injected engine) दिलं आहे. हे इंजिन 27.33 bhp ची पॉवर आणि 27.02 Nm पीक टॉर्क जनरेट करते. तुम्हाला हवं तर बाइकसाठी टेस्ट ड्राइव्हचा पर्यायही आहे.
-
किंमत: अपडेटेड 2021 Jawa forty two ची एक्स-शोरुम किंमत 1 लाख 83 हजार 942 रुपये ठेवण्यात आली आहे.

Pahalgam Terror Attack : गोळीबार सुरू होताच झाडावर चढून केलं संपूर्ण हल्ल्याचं रेकॉर्डिंग; स्थानिक व्हिडीओग्राफर बनला NIAचा प्रमुख साक्षीदार