-
तुम्ही सध्या घर घेण्याचा विचार करत असला तर अनेक बँका सध्या तुमच्यासारख्या ग्राहकांना कर्ज देण्यासाठी तयार आहेत. अनेक बँकांनी आपल्या गृहकर्जांवर आकारण्यात येणारा व्याजदर कमालीचा कमी केला आहे.
-
स्वस्त गृहकर्जाबरोबरच ईएमआय देण्यासंदर्भातही अनेक पर्याय सध्या देशभरातील बँका आपल्या ग्राहकांना उपलब्ध करुन देत आहेत.
-
कोटक महिंद्रा बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या गृहकर्जावरील व्याजदरामध्ये कपात केली आहे. याच पार्श्वभूमीवर देशातील सर्वात स्वस्त गृहकर्ज देणाऱ्या दहा बँकांची यादी आणि ते किती दराने गृहकर्ज देत आहेत हे आपण या गॅलरीमध्ये जाणून घेणार आहोत.
-
सर्वात स्वस्तात गृह कर्ज देणाऱ्या बँकांच्या यादीत दहाव्या क्रमाकांवर आहे आयसीआयसीआय बँक. आयसीआयसीआय बँकेकडून ६.९० टक्के दराने गृहकर्ज दिलं जात आहे.
-
या यादीत नवव्या क्रमांकावर असणारी अॅक्सेस बँकही ६.९० टक्के दराने गृहकर्ज देत आहे.
-
स्वस्त गृहकर्ज देणाऱ्या बँकांच्या यादीत आठव्या क्रमांकावर असणाऱ्या बँक ऑफ इंडियाकडून ६.८५ टक्के दराने गृहकर्ज दिलं जात आहे.
-
बँक ऑफ बडोदा ६.८५ टक्क्यांनी गृहकर्ज उपलब्ध करुन देत आहे. स्वस्त गृहकर्ज देणाऱ्या बँकांच्या यादीत ही बँक सातव्या स्थानी आहे.
-
या यादीमध्ये सहाव्या स्थानी पंजाब नॅशनल बँक आहे. पीएनबी गृहकर्जावर ६.८० टक्के व्याज आकारत आहे.
-
यूनियन बँकेनेही आपल्या गृहकर्जाचे दर ६.८० टक्के इतके ठेवले आहेत. ही बँक या यादीमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे.
-
खासगी क्षेत्रातील भारतातील सर्वात मोठी बँक असणारी एचडीएफसी बँक स्वस्त गृहकर्ज देणाऱ्या बँकाच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. एचडीएफसी ग्राहकांना ६.८० टक्के दराने गृहकर्ज देत आहे.
-
या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर सिटी बँक आहे. सिटी बँक ६.७५ टक्के व्याजदराने गृहकर्ज ग्राहकांना देत आहे.
-
स्टेट बँक ऑफ इंडियाने व्याजदरांमध्ये कपात केली आहे.
-
एसबीआयने सिबिल स्कोरच्या आधारावर गृहकर्जांवर ७० बेसिक पॉइण्ट म्हणजेच ०.७ टक्क्यांनी कपात केलीय. त्यामुळे या यादीमध्ये एसबीआय दुसऱ्या क्रमांकावर आहे.
-
(संग्रहित छायाचित्र)
-
एसबीआयने हे दर ३१ मार्च पर्यत लागू असतील असं बँकेने स्पष्ट केलं आहे.
-
तसेच ३१ मार्चपर्यंत गृहकर्जावरील संपूर्ण प्रोसेसिंग फी माफ करण्यात आल्याचेही एसबीआयने म्हटले आहे.
-
कोटक महिंद्रा बँकने एक मार्चपासून आपल्या गृहकर्जावरील व्याजदर कमी केला आहे. ही कपात इतकी आहे की बँकेने सर्वात स्वस्तात गृहकर्ज देणाऱ्या बँकांच्या यादीत पहिलं स्थान पटकावलं आहे.
-
कोटक महिंद्रा बँकने दहा बेसिक पॉइण्ट म्हणजेच बीपीएसने व्याजदर कमी केलेत. त्यामुळे आता बँकेकडून ६.६५ टक्क्याने गृहकर्ज दिलं जात आहे.
-
सध्या गृहकर्ज देणाऱ्या कोणत्याही बँकेपेक्षा आमचे व्याजदर सर्वात कमी आहेत असं कोटक महिंद्रा बँकने म्हटलं आहे.
-
हे दर ३१ मार्च पर्यत लागू असतील असं कोटक महिंद्रा बँकेने स्पष्ट केलं आहे.
-
त्यामुळे ही यादी पाहता गृहकर्ज काढण्यासंदर्भात विचार करत असणाऱ्यांसाठी ३१ मार्चपर्यंत चांगली संधी उपलब्ध आहे असं म्हणता येईल. (फोटो: रॉयटर्स, इंडियन एक्सप्रेस, फायनॅनशियल एक्सप्रेस आणि ट्विटरवरुन साभार)
‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…