-
दूध हा मूळ घटक असल्याने पनीर आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असते. प्रथिनयुक्त असा हा पदार्थ आहारात असणे अतिशय आवश्यक आहे. पनीर हा चवीला उत्तम असण्यासोबतच त्याचे अन्यदेखील काही गुणकारी फायदे आहेत. त्यामुळे पनीर खाण्याचे फायदे कोणते ते जाणून घेऊयात.
-
भुकेवर नियंत्रण राहण्यास उपयुक्त – पनीरमध्ये प्रथिने असल्याने ऊर्जा हळूहळू वापरली जाते. यामुळे रक्तातील शर्करेची पातळी नियंत्रित राहते. तसेच ती झटकन वाढून कमी देखील होत नाही. त्यामुळे पनीर असलेले पदार्थ खाल्याने बराच वेळ भुकेवर नियंत्रण राहते.
-
दातांच्या मजबुतीसाठी आवश्यक – पनीरमध्ये प्रथिने असते हे आपण नेहमी ऐकतो मात्र त्यामध्ये कॅल्शियमही जास्त असल्याने दात आणि हाडे मजबूत होण्यास मदत होते.
-
शरीराला आवश्यक प्रथिनांचा साठा – शाकाहारी लोक मांस खात नसल्याने त्यांच्यात प्रथिनांची कमतरता असण्याची शक्यता असते. त्याच्यासाठी प्रथिनांचा साठा असलेले पनीर अतिशय उपयुक्त आहे. प्रथिनांचे प्रमाण संतुलित असल्याने स्नायू बळकट होतात तसेच वजन कमी होण्यासही मदत होते.
-
चरबी कमी होण्यास उपयुक्त – प्रथिने आणि कॅल्शियमबरोबरच पनीरमध्ये कॉन्ज्युगेट लिनोलीक अॅसिड नामक फॅटी अॅसिड असते. यामुळे शरीरातील चरबी कमी होऊन वजन घटण्यास मदत होते. वजन कमी करायचे असल्यास आहारात पनीर असलेल्या पदार्थांचा समावेश करावा.
-
घातक आजारांपासून बचाव – कॅन्सर, हृदयविकार यांसारख्या गंभीर आजारांपासूनही पनीरमुळे संरक्षण होते. पनीर असलेले पदार्थ खाल्याने शरीरातील कॅन्सरच्या पेशींची वाढ खुंटते. याचबरोबर रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होण्याचे प्रमाणही कमी होते. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
-
पनीर योग्य प्रमाणात खाल्ल्यास पचनक्रिया सुधारते आणि अपचन, गॅसेस यांचा त्रास कमी होतो.
-
हा दुग्धजन्य पदार्थ असला तरी पनीरमध्ये दुधापेक्षा जास्त पोषक घटक असतात.
-
पनीरमध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असल्याने ज्यांना हृदयरोग, मधुमेह किंवा इतर काही त्रास असतील त्यांनी पनीर डॉक्टरांच्या सल्ल्याने पनीर खावे.
-
ही बातमी जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.
Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल