-
अनेक लोक वजन कमी करण्याचा विचार करतात. वजन कमी करण्यासाठी सगळे लोक ग्रीन टी आणि ब्लॅक कॉफीला प्राधान्य देतात. नेहमी जी चहा किंवा कॉफी पितो त्या पेक्षा हे उत्तम आहे. कारण नेहमीच्या चहा आणि कॉफीमध्ये जास्त कॅलरीज असतात आणि यामुळे आपले वजन कमी होत नाही. ग्रीन टी आणि ब्लॅक कॉफी या दोन्हीमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी आणि अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असते. यामुळेच आपल्याला अन्नपचनात आणि चरबी कमी करण्यास मदत होते. मात्र, वजन कमी करण्यासाठी या दोघांपैकी सगळ्यात चांगलं काय आहे यावर अजूनही वाद होताना दिसतात. या गॅलरीत आम्ही हे सगळे प्रश्न दुर करण्याचा प्रयत्न करत आहोत…
-
ज्या लोकांना त्यांचे वजन जेवढे आहे तेवढेच ठेवायचे आहे ते लोक ग्रीन टी पिण्यावर भर देतात. जर कधी अचानक वजन वाढले तर बहुतेक लोक दिवसातून ३-४ वेळा ग्रीन टी पितात. ग्रीन टी फक्त वजन कमी करण्यासाठीच नाही तर त्याचे अनेक फायदे देखील आहेत. ग्रीन टीचा फायदा त्यात असलेल्या कॅफिनच्या उपस्थितीमुळे होतो. यामुळे शरीरातील जास्तप्रमाणात असलेली चरबी कमी होते. २०१० च्या अभ्यासानुसार, ग्रीन टी वजनकमी करण्याचा प्रयत्न करत असलेल्या लोकांवर सकारात्मक परिणाम दाखवते.
-
वजन कमी करण्याव्यतिरिक्त, उच्च कोलेस्ट्रॉल, हृदयाच्या समस्या आणि टाइप 2 मधुमेह या समस्येमुळे त्रस्त असलेल्या लोकांसाठी देखील ग्रीन टी चांगली आहे. ग्रीन टीमध्ये व्हिटॅमिन बी, फोलेट, मॅग्नेशियम आणि फ्लेव्होनॉइड असतात, जे आपल्या नेहमीच्या दूधाच्या चहामध्ये नसतात.
-
ब्लॅक कॉफी देखील वजन कमी करण्यासाठी लोकप्रिय आहे. बहुतेक लोकांना जेव्हा त्यांचे वजन कमी करायचे असते तेव्हा ते ब्लॅक कॉफी पितात. काही लोक नाष्ट्याला ब्लॅक कॉफी तूप किंवा बटर सोबत पितात. जेणे करून त्यांना लवकर भूक लागणार नाही.
-
ब्लॅक कॉफी नेहमीच्या दूधाच्या कॉफीपेक्षा चांगली आहे. कारण यात साखर आणि मलई नाही. ग्रीन टी प्रमाणेच कॉफीमध्येही कॅफिन असते ज्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो. ब्लॅक कॉफीमुळे अन्नपचन होण्यास मदत होते. सोबतच ब्लॅक कॉफीमुळे लवकर भूक लागत नाही
-
ब्लॅक कॉफी पिण्याचे फायदे केवळ इतकेच मर्यादित नाहीत. ब्लॅक कॉफी देखील कित्येक अँटीऑक्सिडेंट्स आणि व्हिटॅमिन बी 2, बी 3, बी 5, मॅंगनीज, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारख्या पोषक द्रवाने भरलेली आहे. त्याचं नियमित सेवन केल्याने स्मरणशक्ती आणि कार्यक्षमता वाढू शकते.
-
ग्रीन टी आणि ब्लॅक कॉफी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे मदत करतात आणि अभ्यासानुसार, वजन कमी करण्यासाठी आपल्या आहारत या दोन्ही गोष्टींचा समावेश केला जाऊ शकतो. या दोघांमुळे वजन कमी होण्यास मदत होते. फक्त जर आपण त्यातून मिळणारे फायद्यांची तुलना केली तर आपल्या आरोग्यासाठी ग्रीन टी हा एक चांगला पर्याय आहे.
-
ग्रीन टीमध्ये जास्त अँटीऑक्सिडेंट आणि पोषकता असते. जे आपल्या शरीराती प्रणालीला मदत करते. ग्रीन टी किंवा ब्लॅक कॉफी निवडताना खात्री करुन घ्या की तुम्ही त्याचे सेवन जास्त प्रमाणात करत नाही. कारण या दोघांचे अति सेवन आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.
-
या दोघांमध्ये कॅफिनचे प्रमाण असते आणि या दोन्ही गोष्टी एका दिवसात २ कप पेक्षा जास्त पिऊ नये. दिवसभरात जर जास्त प्रमाणात याचे सेवन केले तर यामुळे निद्रानाश होऊ शकतो. तसेच, वजम कमी करणे हे आपल्या दैनंदिन जीवनातील बदल्यांवर अवलंबून आहे.
-
फक्त एक गोष्ट जास्त प्रमाणात केल्याने त्याचा फायदा होणार नाही. लवकर वजन कमी करण्यासाठी निरोगी आहार, व्यायाम आणि झोपेची गरज असते.

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य