-
दिवसभरात एका व्यक्तीने ३ ते ४ लिटर पाणी पिणे आवश्यक असते असे आपण वारंवार ऐकतो. शरीरातील सर्व क्रिया योग्य पद्धतीने होण्यासाठी शरीराला पाण्याची आवश्यकता असते.
-
तांब्याच्या भांड्यातील पाणी आरोग्याला लाभदायक असते असेही घरातील ज्येष्ठ मंडळींकडून सांगितले जाते. पण याचे नेमके फायदे काय हे मात्र आपल्यातील अनेकांना माहित नसते. पाहूयात काय आहेत तांब्यातील पाणी पिण्याचे फायदे…
-
रात्री झोपताना पाणी तांब्याच्या भांड्यात भरुन ठेवल्यास शरीराच्या अनेक तक्रारी औषधाविना बऱ्या होतात. या पाण्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जातात. त्यामुळे शरीर शुद्ध होण्यास मदत होते.
-
सांधेदुखी ही सध्या अतिशय सामान्य तक्रार झाली आहे. तांब्याच्या भांड्यात पाणी प्यायल्याने शरीरातील युरीक अॅसिड कमी होण्यास मदत होते. त्यामुळे सांधेदुखीच्या तक्रारीपासून आराम मिळण्यास मदत होते. अर्थायटीस किंवा सांधेदुखीच्या समस्या दूर होण्यास याची मदत होते.
-
थायरॉईडच्या त्रासापासून सुटका करुन घेण्यासाठी तांब्यातील पाणी पिणे उपयुक्त ठरते. हार्मोनचा समतोल राखण्यासाठी असे पाणी उपयोगाचे असल्याने थायरॉईडचा त्रास असणाऱ्यांनी रात्री तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यावे.
-
ज्यांना वारंवार कफ होतो अशांसाठीही तांब्यातील पाणी अतिशय उपयुक्त असते. ८ तास पाणी तांब्याच्या भांड्यात ठेवल्यास त्यातील आवश्यक ते घटक पाण्यात उतरतात त्यात तुळशीचे पान टाकून ते प्यायल्यास कफाच्या समस्येपासून आराम मिळतो.
-
तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या येत नाहीत. चेहऱ्यावरील मृत त्वचा निघून जाण्यास यामुळे मदत होते तसेच चेहरा तजेलदार दिसतो. त्यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य टिकवायचे असल्यास तांब्याचे पाणी पिणे आवश्यक असते.
-
सध्या जीवनशैलीचा वेग वाढल्याने अनेकांच्या हृदयावर ताण येण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे कोलेस्टरॉलची पातळी वाढणे, हृदयविकार यांसारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत.
-
या सर्व समस्यांवर तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यास त्याचा शरीराला उत्तम फायदा होतो.
-
ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल