-
निरागसता इतकी असावी की चेहऱ्याला सौंदर्याची गरज नसावी – व. पु. काळे
-
मनाला न पटणारी गोष्ट करण्यासाठीच जास्त धैर्य लागतं – व. पु. काळे
एकाकीपण वेगळं, एकांत वेगळा. परिसराचं मौन म्हणजे एकांत आणि परिवारात असतानाही पोरकं वाटणं हे एकाकीपण – व. पु. काळे -
तुम्ही आम्ही सगळेच कैदी. प्रत्येक जण कुठे ना कुठे अडकलेला. कुणाची बेडी दिसते तर कुणाची नाही, एवढाच फरक – व. पु. काळे
-
खरं बोलणाऱ्या माणसाच्या वाट्याला जास्त प्रश्न येतात. खोटं बोलणार माणूस कुणाच्या तावडीत सापडत नाही. खरं बोलणाऱ्या माणसाला उपदेश करणारे जास्त असतात. – व. पु. काळे
-
आवडत्या व्यक्तीच्या सहवासात किती वेळ गेला समजत नाही त्याच आवडत्या व्यत्तीच्या प्रतीक्षेत काळ नकोसा वाटतो – व. पु. काळे
-
प्रश्नांपासून नेहमीच पळता येत नाही कधी ना कधी ते पळणाऱ्याला गाठतातच, पळवाटा मुक्कामाला पोहचवत नाहीत, मुक्कामाला पोहचवतात ते सरळ रस्तेच… – व. पु. काळे
-
कुणालाही बदलण्याचा खटाटोप माणसाने करू नये, असह्य झालं तर अलिप्त व्हावं.. उपदेशक होऊ नये – व. पु. काळे
-
योग्य वयात आणि योग्यवेळी त्या-त्या गोष्टी व्हायला हव्यातच म्हणजे मन आणि बुद्वी शांत राहते – व. पु. काळे
-
ज्या माणसाला विचारांची सोबत आहे, त्याला कोणतंही अंतर लांब वाटत नाही – व. पु. काळे
धक्कादायक! मार्क वाढवून देतो सांगत दोन शिक्षकांचा विद्यार्थ्याच्या आईवर लैंगिक अत्याचार; गुन्हा दाखल