-
सृष्टीमध्ये निर्माण होणाऱ्या सर्व फळांमध्ये फणस हे फळ आकाराने सर्वात मोठे असते. भारत आणि दक्षिण आशिया हे फणसाचे मूळ स्थान आहे. बाहेरुन कितीही काटे असले तरी आत रसाळ गोड गरे असतात. त्यामुळे फणस हा अनेकांच्या आवडीचा असतो. परंतु, फणस खाण्याचे अनेक शारीरिक फायदे आहेत. त्यामुळे फणसपोळी, फणसाचा गर, सरबत या सारख्या विविध पदार्थांमधून गृहिणी आपल्या कुटुंबाला फणस खायला देतात. फणस खाण्याचे नेमके फायदे कोणते ते पाहुयात…
-
फणसामध्ये आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असणारी मॅग्नेशिअम, कॅल्शिअम, लोह, पोटॅशिअम, फॉस्फरस, कॉपर, झिंक आणि सेलेनियम ही खनिजे आहेत.
-
फणस हा फायबरचा मोठा स्त्रोत असून ११ टक्क्यांपर्यंत फायबर फणसापासून मिळते.
-
फणसामध्ये कोणत्याही प्रकारची साखर नसल्यामुळे मधुमेह झालेल्यांसाठी महत्त्वाचे फळ.
-
फणसामुळे शरीराची योग्य वाढ होण्यास मदत मिळते.
-
फणसातील पोषणद्रव्यांमध्ये कर्करोग विरोधी, क्षरण विरोधी आणि अल्सर विरोधी घटक असल्यामुळे अनेक रोगांवर गुणकारी.
-
फणसामध्ये सोडिअमचे प्रमाण कमी असून, कोलेस्ट्रॉल आणि चरबीवर नियंत्रण मिळते.
-
आरोग्यासाठी महत्त्वाचे जीवनसत्त्व ए, सी, रायबोफ्लेव्हिन, निअँसिन, थायमिन आणि फोलेट हे घटक फणसात आहेत.
-
फणसाच्या झाडापासून मिळणारा चीक रातांधळेपणा कमी करण्यासाठी वापरला जातो. व्हिनेगरमध्ये मिसळून तो सूज कमी करण्यासाठीही उपयुक्त ठरतो. कोवळ्या पानांचा लेप सूज असलेल्या जागेवर लावावा.
-
ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.
Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल