-
आधारकार्ड आणि पॅनकार्ड 'लिंक' करणं केंद्र सरकारनं अनिवार्य केलं आहे. त्यासाठी आज ३१ मार्च २०२१ ही अंतिम मुदत दिली आहे. यापुढे सरकारकडून मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता कमी आहे. जर तुम्ही ३१ मार्च २०२१ आधी आधारकार्ड आणि पॅनकार्डची जोडणी केली नाही तर तुमचं पॅन कार्ड रद्द होऊ शकतं. त्यामुळे जर तुम्हीही अद्याप आधार-पॅन लिंक केलेलं नसेल तर तुम्हाला या सोप्या टिप्स कामी येतील.
-
१. आयकर विभागाच्या वेबसाईटवर (https://www.incometaxindiaefiling.gov.in/home) गेल्यास अशी स्क्रिन येईल.
-
२. या वेबसाइटवर डाव्या बाजूला ‘link adhaar’ हा पर्याय आहे. त्यावर क्लिक केल्यावर एक फॉर्म येईल.
-
३. या फॉर्ममध्ये तुम्हाला वेगवेगळी माहिती भरावी लागेल. त्यासाठी पॅन कार्ड आणि आधार कार्ड तुमच्या समोर असू द्या.
-
४. जिथे पॅन असं लिहिलेलं आहे, तिथे पॅन नंबर टाका. हा नंबर तुमच्या पॅन कार्डवर असेल.
-
५. त्यानंतर तुम्हाला आधार कार्डची माहिती द्यायची आहे. या बॉक्समध्ये आधार कार्डवर दिलेला नंबर टाकावा लागेल.
-
६. Name as per AADHAAR या बॉक्समध्ये तुमच्या आधार कार्डवर दिलेलं इंग्रजीतील नाव जशास तसं टाकावं लागेल. त्यात कोणतीही चूक झाल्यास लिंक होणार नाही.
-
७. ही माहिती भरताना तुम्हाला ‘ i have only year of birth in adhaar card’ चा पर्याय दिसेल. जर तुम्ही आधारकार्डवर फक्त जन्मवर्षच भरलं असेल तर या पर्यायावर टिक करा.
-
८. त्यानंतर या बॉक्सवर क्लिक करून तुम्हाला आधार कार्डची वैधता तपासण्याची परवानगी द्यावी लागेल.
-
९. वरील सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला आता कॅप्चा कोड असा बॉक्स दिसेल. त्यात इंग्रजीत दिलेला कोड खालील बॉक्समध्ये भरावा लागेल. त्यातही कोणतीही चूक करू नका. अन्यथा पॅन-आधार लिकिंगची प्रक्रिया पुढे जाणारच नाही.
-
१०. आता शेवटी तुमचं आधार लिंक करण्यासाठी Link AADHAAR या बॉक्सवर क्लिक करा. त्यानंतर तुमची पॅन-आधार जोडणी प्रक्रिया पूर्ण होईल.

बापरे! भरधाव ट्रकमधला पत्रा उडाला; तरुणाचं डोकं एकीकडे अन् शरीर एकीकडे, अपघाताचा काळीज पिळवटून टाकणारा VIDEO समोर