-
भारतात करोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असल्यामुळे सध्या विविध मोबाईल कंपन्यांनी आपले प्रोडक्ट देशात लाँच करायला सुरूवात केली आहे. स्वस्त पण चांगले फिचर्स असलेले स्मार्ट फोन मार्केटमध्ये येत आहेत. नुकताच शाओमी ( Xiaomi) या कंपनीने Mi 11 Lite स्मार्टफोन आणि Mi Watch हे दोन प्रोडक्ट लाँच केले. मोबाईल २८ जून पासून Mi.com, प्लिपकार्ट, एमआय होम स्टोअर तसेच तुमच्या घरा जवळच्या रिटेल स्टोअरमध्ये खरेदी करता येऊ शकतो.
-
Mi 11 Lite या स्मार्टफोनची भारतीय बाजारपेठेत किंमत २१,९९९ रूपये इतकी आहे. यामध्ये तुम्हाला ६ जीबी रॅम व १२८ जीबी इंटरनल स्टोरेजसाठी दिला आहे. तर ८ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोरेजसाठी २३,९९९ रूपये मोजावे लागणार आहे.
-
कंपनीने हा स्मार्टफोन तीन रंगांमध्ये ग्राहकांच्या समोर आणला आहे. Jazz Blue, Tuscany Coral आणि Vinyl Black या रंगांमध्ये स्मार्टफोन खूपच आकर्षक दिसत आहे.
-
कंपकंपनीने Mi 11 Lite मध्ये ६.५५ इंचाची फुल एचडी स्क्रीन दिली आहे. अँड्रॉइड ११ वर हा फोन काम करेल. फोन डॅमेज होऊ नये यासाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास थ्री प्रोटेक्शन मिळते. पॉवरसाठी फोनमध्ये ४,२५० एमएएचची दमदार बॅटरी मिळेल, जी ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसोबत येते. फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्स, आठ मेगापिक्सल अल्ट्रा वाईड अॅंगल सेन्सर, आणि ५ मेगापिक्सलची लेन्स आहे. १६ मेगा पिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.नीने Mi 11 Lite मध्ये ६.५५ इंचाची फुल एचडी स्क्रीन दिली आहे. अँड्रॉइड ११ वर हा फोन काम करेल. फोन डॅमेज होऊ नये यासाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास थ्री प्रोटेक्शन मिळते. पॉवरसाठी फोनमध्ये ४,२५० एमएएचची दमदार बॅटरी मिळेल, जी ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसोबत येते. फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्स, आठ मेगापिक्सल अल्ट्रा वाईड अॅंगल सेन्सर, आणि ५ मेगापिक्सलची लेन्स आहे. १६ मेगा पिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
-
ज्यांना Mi Watch Revolve हे स्मार्टवॉच खरेदी करायचे आहे अशांसाठी कंपनीने आकर्षक ऑफर जाहिर केली आहे. वॉचच्या जुन्या किंमतीत एक हजार रूपयांनी कपात केली आहे. २५ जूनपासून हे स्मार्टवॉच तुम्हाला ८,९९९ रुपये किंमतीत खरेदी करता येऊ शकते. यात १.३९ इंचाचा अमोलेड डिस्प्ले दिला आहे. VO2 मॅक्स सेंसर, SpO2 सेंसर, जीपीएस, फोन व मेसेजचे नोटिफिकेशन, स्लिप मॉनिटर, हार्ट रेट मॉनिटर, टायमर यांसारखे फिचर्स आहेत.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”