-
ताक, दूध, शहाळं पाणी, लिंबू सरबत यांसारख्या पेयांचा वापर केल्यास उपवासामुळे कमी होणारी ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते.
-
खजूर, राजगिरा, रताळे, सुकामेवा – फक्त बटाटा खाण्यापेक्षा हे पदार्थ उपवासाला आवर्जून खा. यामुळे जास्त उर्जा मिळते. त्रास होण्याची शक्यताही कमी असते.
-
खिचडी – साबुदाणा मर्यादेत खाल्ल्यास त्रास होत नाही. त्यात जास्त प्रमाणात कार्बोदके असतात त्यामुळे आरोग्याला त्रास होण्याची शक्यता असते. पण साबुदाणा खिचडी मर्यादेत खालली तर त्रास होत नाही.
-
शेंगदाणे – दाण्यामध्येही कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. यामुळे पित्ताचा त्रासही होऊ शकतो.
-
फलाहार – कोणत्याही वयोगटातील व्यक्ती उपवास करत असेल तर त्याने आवर्जून फळ खायला हवी. फळातील साखरेमुळे शरीराला उर्जा मिळते. फळं पचायलाही सोप्पी असतात.उपवासाच्या दिवशी जास्तीत जास्त फळांचा आहारात समावेश ठेवल्यास भूक भागते.
-
मधुमेही लोकांनी देखील उपाशी राहणे टाळावे. साबुदाणा, वरई हे पदार्थ जात खाणे टाळावे. (सर्व फोटो: freepik)

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य