-
आपल्यातील अनेकांना त्वचेवर रॅश, अॅलर्जी होते. त्वचेवर पुरळ येणे, जळजळ होणे, खाज सुटणे, लाल चट्टे उठणे यासारख्या समस्या उद्भवतात. रॅशेस हे अनेक आरोग्य समस्यांचे कारण असू शकते.
-
तर काहींना अनुवांशिक एखाद्या त्वचेसंबंधित समस्या असू शकते. तज्ज्ञांच्या मते, काही घरगुती उपचारांचा वापर करुन तुम्ही ही समस्या कमी करु शकता.
-
ज्या लोकांना अॅलर्जीचा त्रास आहे, त्यांना त्वचेवर खूप खाज येते. त्यामुळे या व्यक्तींनी त्या भागाला स्पर्श करणे टाळा.
-
कापूर आणि खोबरेल तेल – त्वचेच्या अॅलर्जीवर कापूर आणि खोबरेल तेल फार फायदेशीर ठरते. जर तुम्हाला त्वचेवर अॅलर्जी झाली असल्यात कापराची बारीक पूड करुन त्यात खोबरेल तेल मिसळा. त्यानंतर दिवसातून दोन वेळा ती अॅलर्जी झालेल्या भागावर लावा.
-
कोरफड जेल : त्वचेवर झालेल्या अॅलर्जीमुळे खाज सुटणे, पुरळ येणे, जळजळ होणे, वेदना यासारख्या समस्या उद्भवू शकतात. ही समस्या कमी करण्यासाठी अनेक जण कोरफडीचा वापर करु शकतात.
-
कोरफडमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म आढळतात. त्यामुळे ते त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात.
-
तुरटी – त्वचेवरील पुरळ आणि खाज दूर करणारे अनेक गुणधर्म तुरटीत असतात. तुरटीचा वापर करण्यासाठी ती काही काळ पाण्यात ठेवा. त्यानंतर हे पाणी अॅलर्जीच्या खाज किंवा सूज या ठिकाणी लावा.
-
त्यानंतर पुरळ झालेल्या काही भागावर कापूर किंवा मोहरी मिसळा. त्यामुळे त्वचेच्या समस्या कमी होतील.
-
कडुलिंब : कडुनिंबाच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटी-व्हायरल घटक आढळतात.
-
यामुळे त्वचेच्या संसर्गाचा धोका कमी होतो. तसेच, कडुलिंबाच्या पानांमध्ये असलेले गुणधर्म त्वचा स्वच्छ करण्यास मदत करतात.
-
अॅपल साइडर व्हिनेगर – अॅपल साइडर व्हिनेगर हे त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रभावी असल्याचे बोललं जातं. त्वचेवर येणाऱ्या खाज आणि अॅलर्जीचा प्रभाव कमी करण्यासाठी तुम्ही एक कप गरम पाणी घेऊन त्यात एक चमचा अॅपल साइडर व्हिनेगर मिसळा. हे पाणी थंड झाल्यानंतर त्याने तुमचा चेहरा धुवा.

Devendra Fadnavis : ‘मी शिंदेंना सांगणार, कडक समज द्या, अन्यथा…’, संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून फडणवीसांचा मोठा इशारा