-
आपल्या लॅपटॉपची बॅटरी लाईफ अत्यंत महत्वाचं आहे. ते चांगली नसेल तर आपली कशी तारांबळ उडते हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. (Photo : Pixabay)
दरम्यान, लॅपटॉपची बॅटरी कालांतराने कमकुवत होत जाते. त्यानंतर आपल्याला बॅटरी रिप्लेसमेंटचा सल्ला देखील दिला जातो. (Photo : Indian Express) -
आपल्या लॅपटॉपची बॅटरी लाईफ चांगली नसेल तर अनेक महत्त्वाची कामं खोळंबतात. याउलट जर बॅटरी चांगली असेल तर खूप चांगला बॅकअप मिळतो. (Photo : Indian Express)
-
पण मुख्य प्रश्न आहे असा की तुम्हाला बॅटरीच्या कंडिशनबद्दल नेमकं कसं कळेल? म्हणजेच, तुम्ही तुमच्या लॅपटॉपची बॅटरी कधी बदलायची हे कसं शोधाल?
-
तर विंडोज १० चे सिक्रेट टूल्स तुम्हाला यासाठी मदत करतील. याद्वारे तुम्ही तुमच्या लॅपटॉपच्या बॅटरीची नेमकी कंडिशन जाणून घेऊ शकता. (Photo : Indian Express)
-
आम्ही याला एक सिक्रेट टूल्स म्हणत आहोत याच कारण असं कि आपल्याला हे टूल स्टार्ट मेन्यू किंवा सेटिंगमध्ये दिसणार नाही. (Photo : Indian Express)
-
आम्ही तुम्हाला ते कसं वापरायचं आणि त्याद्वारे बॅटरीची कंडिशन कशी जाणून घ्यावी ते सांगणार आहोत. (Photo : Indian Express)
-
हे सिक्रेट टूल ऍक्सेस करण्यासाठी आपण पहिल्यांदा कमांड प्रॉम्प्ट लाँच करणं आवश्यक आहे. यासाठी विंडोज सर्च किंवा स्टार्ट मेनूमधून सीएमडी किंवा कमांड प्रॉम्प्ट शोधा. (Photo : Indian Express)
-
यानंतर काळ्या बॅकग्राउंडसह कमांड प्रॉम्प्ट ओपन होईल. आता यामध्ये तुम्हाला powercfg /batteryreport टाईप करून एंटर बटन दाबावं लागेल. (Photo : Indian Express)
-
तुम्हाला एक मेसेज दिसेल ज्यामध्ये लिहिलेलं असेल की बॅटरी लाईफ रिपोर्ट सेव्ह केला गेला आहे. (Photo : Indian Pixabay)
-
यासह जिथे ही फाईल सेव्ह केली जाईल त्या फाईलचा मार्ग अर्थात फाईलचा पाथ देखील तुम्हाला इथे दिसेल. (Photo : Financial Express)
-
हे C: Users [Your_User_Name] battery-report.html असं देखील असू शकतं. तुम्ही हे फोल्डर ओपन करा. (Photo : Reuters)
-
तुम्हाला या फाईलमध्ये तुमच्या लॅपटॉपची डिझाईन कपॅसिटी आणि फुल चार्जिंग कपॅसिटी बघता येईल. (Photo : Reuters)
डिझाईन कपॅसिटी म्हणजे तुमचा लॅपटॉप नवीन होता तेव्हा कसा होता? तर फुल चार्जिंग कपॅसिटी म्हणजे आता तुमच्या बॅटरीची कपॅसिटी किती आहे? (Photo : Financial Express) डिझाईन कपॅसिटी म्हणजे तुमचा लॅपटॉप नवीन होता तेव्हा कसा होता? तर फुल चार्जिंग कपॅसिटी म्हणजे आता तुमच्या बॅटरीची कपॅसिटी किती आहे? (Photo : Financial Express) -
या व्यतिरिक्त, त्यात बरेच रिपोर्ट असतील जे तुम्हाला तुमच्या लॅपटॉप बॅटरीची कंडिशन समजण्यास मदत करतील.
Dr. Ambedkar Jayanti: डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर पाठवा ‘या’ खास मराठमोळ्या शुभेच्छा; पोस्ट करा सुंदर HD Images