-
भावाने बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घ्यायची या संकल्पनेचे प्रतीकात्मक सांस्कृतिक रूप म्हणजे रक्षाबंधनाचा सण. (फोटो: Pixabay)
-
रविवारी २२ ऑगस्ट रोजी यंदा रक्षाबंधनाचा हा सण आहे. (फोटो: Pixabay)
-
अनेक तरुण बहिणीला ओवाळणी काय द्यावी, याचा विचार करत असतील. (फोटो: Pixabay)
-
आयत्यावेळी, अवघा एक दिवस उरलेला असतांना काय भेटवस्तू द्याव हे समजत असेल तर खाली दिलेले काही पर्याय तुमच्या कामाला नक्कीच येतील. (फोटो: Pixabay)
-
सेंट असलेली मेणबत्ती. अशा मेणबत्त्या सध्या खूप ट्रेण्डमध्ये आहेत. (फोटो: Pixabay)
-
सेंट असलेली मेणबत्ती सुंदर रंग,आकार,सुवासासह अनेक दुकानात सहज उपलब्ध आहे. (फोटो: Pixabay)
-
घर सजवायला आवडणाऱ्या बहिणींसाठी सेंट मेणबत्ती ही उत्तम भेटवस्तू ठरेल. (फोटो: Pixabay)
-
कॉफी मग, ही फार कॉमन भेटवस्तू असली तरी याला तुम्ही हटके लूक देऊ शकता. (फोटो: Freepik)
-
तुम्ही कॉफी मगवर बहिणीला आवडणाऱ्या सिनेमाचा डायलॉग, गाण्याच्या ओळी किंवा आवडणारा प्रेरणादायी विचार प्रिंट करून घेऊ शकता. (फोटो: Freepik)
-
हे कॉफी मग अगदी कुठेही उपलब्ध होतील. तसेच काही तासात तुम्हाला प्रिंटही करून मिळेल. (फोटो: Freepik)
-
फूड हॅम्परही तुम्ही भेटवस्तू म्हणून देऊ शकता. (फोटो: White Light Food)
-
अशा हॅम्परमध्ये अनेक वेगवेगळे पदार्थ एकत्र करून छान बॉक्समध्ये तयार करून दिले जातात. (फोटो: White Light Food)
-
तुम्ही हे फूड हॅम्पर ऑनलाइनही ऑर्डर करू शकता. (फोटो: White Light Food)
-
फूड हॅम्परप्रमाणे तुम्ही मिठाईचे बॉक्स पण भेटवस्तू म्हणून देऊ शकता. (फोटो:Mad Over Donuts)
-
नेहमीच्या मिठाई पेक्षा तुम्ही सध्या ट्रेण्डमध्ये असलेला गोड पदार्थ म्हणजे डोनट. (फोटो:Mad Over Donuts)
-
तुम्ही तुमच्या बहिणीला आवडणाऱ्या फ्लेवर्सचे डोनेट बॉक्स ऑनलाइन ऑर्डर करू शकता. (फोटो:Mad Over Donuts)
-
झाड हे भेटवस्तू म्हणून एक उत्तम पर्याय ठरू शकतो. (फोटो: Freepik)
-
ही झाड घरात डेकोरेशनसाठी वापरता येतात तसेच काही झाड खूप सकारात्मकता घेऊन येतात. (फोटो: Freepik)
-
बाजारात खूप सुंदर आणि घरात कमी सूर्यप्रकाशात वाढू शकतील अशी झाड उपलब्ध आहेत. (फोटो: Freepik)
फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन सारख्या इ कॉमर्स साईटवर काही उत्पादनावर अगदी एक दिवसात डिलिव्हरी मिळते. तुम्ही अशा निवडक उत्पादनातून गिफ्ट म्हणून काही उत्पादने ऑर्डर करू शकता. (फोटो: Indian Express)
Pahalgam Terror Attack: पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत भारत सोडण्याचे आदेश, पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यासाठी मोदी सरकारचे पाच मोठे निर्णय