-
टाटा मोटर्स १८ ऑक्टोबर २०२१ रोजी भारतात टाटा पंच सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही लाँच करणार आहे.(फोटो: जनसत्ता )
-
आता, त्याच्या अधिकृत लॉन्चच्या आधी, ग्लोबल एनसीएपीने या सब-कॉम्पॅक्ट एसयूव्हीची क्रॅश-चाचणी केली आहे आणि ती भारतातील सर्वात सुरक्षित कार ठरली आहे. (फोटो: financial express)
-
नवीन टाटा पंचने ग्लोबल एनसीएपीच्या नवीनतम #SaferCarsForIndia क्रॅश चाचणीमध्ये संरक्षणासाठी पूर्ण ५ स्टार प्राप्त केले आहे.(फोटो: financial express)
-
ग्लोबल एनसीएपी कडून adult occupant संरक्षणासाठी पूर्ण ५ -स्टार सुरक्षा रेटिंग देण्यात येणारी नेक्सन आणि अल्ट्रोझ नंतर नवीन टाटा पंच भारतातील तिसरी टाटा कार ठरली आहे. (फोटो: Indian Express)
-
टाटा पंचने adult occupant मध्ये एकूण १७ गुणांपैकी १६.४५ गुण मिळवले. child occupant संरक्षणासाठी, एकूण ४९ गुणांपैकी ४०.८९ गुण मिळवले आणि अशा प्रकारे या श्रेणीमध्ये ४-स्टार रेटिंग प्राप्त केले. (फोटो: YouTube)
-
ग्लोबल एनसीएपी नुसार, टाटा पंचची चाचणी त्याच्या सर्वात मूलभूत सुरक्षा तपशीलांमध्ये करण्यात आली होती, त्यात ड्युअल फ्रंट एअरबॅग, ईबीडीसह एबीएस आणि आयएसओफिक्स चाइल्ड सीट माउंट होते. (फोटो: financial express)
-
ग्लोबल एनसीएपीचे म्हणणे आहे की पंच मॉडेलला स्टँडर्ड इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ईएससी), साइड हेड इफेक्ट प्रोटेक्शन सिस्टीम स्टँडर्ड, आणि सर्व बसण्याच्या स्थितीत तीन-पॉइंट बेल्टसह सुसज्ज करून आणखी सुधारित केले जाऊ शकते. (फोटो: financial express)
-
ड्रायव्हर आणि प्रवाशांसाठी सीट बेल्ट रिमाइंडर्स (एसबीआर) देखील देते. हे लक्षात घेण्यासारखे आहे की फ्रंट ऑफसेट डिफॉर्मेबल बॅरियर (ODB) चाचणी व्यतिरिक्त, पूर्ण ५-स्टार सुरक्षा रेटिंगचा दावा करण्यासाठी पंचला UN95 साइड इफेक्ट चाचणी देखील घ्यावी लागली. (फोटो: financial express)
-
ग्लोबल एनसीएपीचे सरचिटणीस अलेजांद्रो फुरस म्हणाले, “टाटा पुन्हा एकदा प्रौढांच्या संरक्षणासाठी सर्वोच्च सुरक्षा रेटिंग आणि नवीन आणि लोकप्रिय मॉडेल श्रेणीतील मुलांसाठी ४ स्टार मिळवले आहे.” (फोटो: financial express)
-
हा स्वयंसेवी चाचणी निकाल भारतासाठी सुरक्षित कारच्या दिशेने टाटाच्या प्रवासाची दिशा निश्चित करतो. (फोटो: financial express)

प्रिया बापट अन् उमेश कामतने घेतलं नवीन घर! गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दिली आनंदाची बातमी, शेअर केले सुंदर फोटो…