-
भारत जगातील सर्वात मोठ्या कार बाजारपेठांपैकी एक आहे. देशात दर महिन्याला अनेक नवीन गाड्या लाँच केल्या जातात.
-
सणासुदीच्या काळात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या येत्या नोव्हेंबरमध्ये आणखी काही कार लॉंच करणार आहेत.
-
या यादीत नवीन पिढीतील मारुती सुझुकी सेलेरियो, टाटा टियागो सीएनजी, ऑडी क्यू ५ फेसलिफ्ट आणि फेसलिफ्टेड फोक्सवॅगन टिगुआन यांचा समावेश करण्यात आला आहे.
-
न्यू-जेन मारुती सुझुकी सेलेरियो – मारुती सुझुकी लवकरच भारतात नवीन जनरेशन सेलेरियो लॉंच करणार आहे.
-
नवीन सेलेरियो ला तेच १.० लिटर पेट्रोल इंजिन मिळेल जे ६७ पीएस आणि ९० एनएम निर्माण करते. या वेळी, ते एक शक्तिशाली १.२ लीटर पेट्रोल इंजिन देखील मिळवू शकते जे ८२ पीएस आणि ११३ एनएम साठी चांगले आहे.
-
दोन्ही इंजिन ५ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि एएमटी शी जोडले जातील. कंपनी त्याचे सीएनजी व्हर्जन देखील देऊ शकते.
-
टाटा मोटर्स लवकरच देशातील पहिली सीएनजी कार लॉन्च करणार आहे. नवीन टाटा टियागो सीएनजी लवकरच भारतात लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. ही कंपनीची पहिली सीएनजी कार असेल.यासाठी टाटा मोटर्सच्या निवडक डीलरशिपवर अनऑफिशियल प्री-बुकिंगही केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
-
सध्या, टियागो BS6 १.२ लीटर, तीन-सिलेंडर पेट्रोल इंजिनसह येते. ही मोटर ६००० RPM वर ८६ PS ची पॉवर आणि ३३०० RPM वर ११३ Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. इंजिन मानक म्हणून ५ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे आणि त्याला पर्यायी ५ स्पीड एएमटी देखील मिळते.
-
टाटा टियागोची आगामी सीएनजी आवृत्ती या पेट्रोल मोटरच्या डी-ट्यून वर्जनसह येईल आणि इंजिन केवळ ५ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडले जाईल.
-
ऑडी पुढील महिन्यात भारतात नवीन ऑडी Q५ फेसलिफ्टलॉन्च करेल. यासाठीचे बुकिंग आधीच सुरू झाले आहे आणि २ लाख रुपये टोकन रक्कम भरून हे बुकिंग करता येईल.
-
नवीन ऑडी Q५ फेसलिफ्ट, बहुतेक नवीन-युगीन ऑडी कार्स प्रमाणे, भारतातील फक्त पेट्रोल मॉडेल असेल.
-
हे २.० लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित असेल जे २४५ पीयेस पॉवर आणि ३७० एन एम पीक टॉर्क जनरेट करते. इंजिनला ७ स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडले जाईल.
-
फोक्सवॅगन इंडिया पुढील महिन्यात देशात फेसलिफ्टेड टिगुआन लाँच करणार आहे. नवीन फोक्सवॅगन टिगुआन फेसलिफ्टला कॉस्मेटिक अपडेट्स आणि नवीन पॉवरट्रेन मिळेल.
-
यामध्ये बीएस ६ कम्प्लायंट २.० लिटर टीएसआई टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित असेल. ही मोटर १९० पीएस ची कमाल पॉवर आणि ३२० एनएम चा पीक टॉर्क जनरेट करेल.
-
इंजिन ७ स्पीड डीएसजी (डायरेक्ट शिफ्ट गियरबॉक्स) शी जोडले जाईल आणि फोक्सवॅगनची ४ मोशन ऑल-व्हील-ड्राइव्ह सिस्टम देखील मिळेल.
-
चेक ऑटोमेकर कुशकच्या लाइन-अपमध्ये अतिरिक्त सुरक्षा फीचर्स १.५ लिटर DSG प्रकारसह एक नवीन प्रकार जोडला गेला आहे.
-
नवीन कुशक १.५ लिटर TSI स्टाईल AT प्रकारात सहा एअरबॅग्ज आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) मिळेल. आतापर्यंत, स्कोडा ऑटोने हे फिचर फक्त कुशक स्टाईल १.५ TSI मॅन्युअल व्हेरियंटवर दिली आहेत.
-
तर विद्यमान १.५ लिटर DSG प्रकार सध्या फक्त ड्युअल एअरबॅगसह उपलब्ध आहे. कंपनी नोव्हेंबर २०२१ च्या मध्यापर्यंत ही एसयुव्ही लाँच करेल. (सर्व फोटो: Finicial Express, Indian express )

२ एप्रिल पंचांग : ‘श्री लक्ष्मी पंचमीला’ मेष, वृषभसह ‘या’ राशींची सुखाने भरणार ओंजळ; आज तुम्हाला कसा मिळणार आशीर्वाद? वाचा राशिभविष्य