-
देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने बुधवारी आपल्या हॅचबॅक कार सेलेरिओचा (CELERIO) नवीन अवतार ‘ऑल न्यू सेलेरियो २०२१’ लाँच केला. कंपनीने ही कार ४.९९ लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत सादर केली आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या कारचे सरासरी मायलेज २६.६८ किलोमीटर प्रति लिटर (kmpl) आहे.
-
जेन नेक्स्ट के १० सी इंजिनसह बनवलेली ही पहिली कार आहे. नवी सेलेरिओ ही भारतातील सर्वात जास्त पेट्रोल इंधन कार्यक्षम कार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. ही कार पाचवी जनरल हार्टेक्ट प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. डिलिव्हरीबद्दल कंपनीने म्हटले आहे की, नवीन सेलेरियो लवकरच ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू.
-
नवीन सेलेरिओ २०२१ कारमध्ये सात इंच टचस्क्रीन कन्सोल, स्टार्ट आणि स्टॉपसाठी पुश बटण, ऑटो इंजिन स्टार्ट/स्टॉप, मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील आहे. तुम्ही मारुती सुझुकी सेलेरियो २०२१ दोन नवीन फायर रेड आणि स्पीडी ब्लू कलर पर्यायांसह आर्क्टिक व्हाइट, सिल्की सिल्व्हर, ग्लिस्टेनिंग ग्रे आणि कॅफीन ब्राउनमध्ये खरेदी करायला मिळेल.
-
मारुती सुझुकीचे कार्यकारी संचालक शशांक श्रीवास्तव सांगतात की, शहरी भागातील स्टायलिश कारप्रेमींना लक्षात घेऊन ही कार सादर करण्यात आली आहे. विशेषत: २४-३५ वयोगटातील ग्राहकांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
-
कारमध्ये ९९८ सी सी के १० सी ३ सिलेंडर इंजिन आहे. इंजिन ४९ के डब्ल्यू @ ५५०० आर पी एम ची कमाल पॉवर देते आणि ८९ एन एम @३५०० आर पी एम ची कमाल टॉर्क जनरेट करते. कारचे एकूण वजन १२६०किलो आहे.
-
सेलेरिओचे आतचे मॉडेल्स २०२१ लाँच झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने बंद केले जातील. कंपनी त्याच्यानंतर पोर्टफोलिओमध्ये सीएनजी ट्रिम देखील समाविष्ट करेल.
-
पाच सीटची ही कार आहे.
-
कारची सामान क्षमता ३१३ लीटर आहे. कारची इंधन टाकीची क्षमता ३२ लीटर आहे. कारमध्ये इलेक्ट्रिक पॉवर स्टिअरिंग आहे.
-
कारला समोर डिस्क ब्रेक सिस्टम आणि मागच्या बाजूला ड्रम ब्रेक सिस्टम आहे. ( सर्व फोटो: http://www.marutisuzuki.com )

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख