-
टीवीएस स्कूटी पेप प्लस (TVS Scooty Pep Plus)
-
टीवीएस स्कूटी पेप प्लस (TVS Scooty Pep Plus) ही अतिशय कमी वजनाची स्कूटर आहे जी कंपनीने दोन प्रकारांसह बाजारात उपलब्ध आहे.
-
या स्कूटरच्या ब्रेकिंग सिस्टीममध्ये कंपनीने पुढील आणि मागील चाकांमध्ये ड्रम ब्रेक लावले आहेत, ज्यामध्ये ट्यूबलेस टायर देण्यात आले आहेत.
-
या स्कूटीला ८७.८ सीसी सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे जे ५.४ पी येस पॉवर आणि ६.५ एनएम पीक टॉर्क जनरेट करते .
-
स्कूटीच्या मायलेजवर, टीवीएस दावा करते की ते शहरात ५८ किलोमीटर प्रति लीटर आणि हायवेवर ७६ किलोमीटर प्रति लीटर मायलेज देते आणि हे मायलेज ARAI प्रमाणित आहे.
-
टीवीएस स्कूटी पेप प्लसची किंमत ५७,९५९ रुपयांपासून सुरू होते जी टॉप मॉडेलमध्ये ६०,८५९ रुपयांपर्यंत जाते.
-
हीरो प्लेजर प्लस (Hero Pleasure Plus)
(हे ही वाचा: ‘या’ आहेत कमी बजेटमध्ये ७६ Kmpl पर्यंत मायलेज देणाऱ्या वजनाने हलक्या स्टायलिश टॉप ३ स्कूटी! ) -
हीरो प्लेजर प्लस (Hero Pleasure Plus)
कंपनीने नवीन एक्सटेक (Xtec) अवतारात लॉंच केला आहे, जो पाच प्रकारांसह बाजारात लॉंच करण्यात आला आहे. -
हीरो प्लेजर प्लसमध्ये, कंपनीने सिंगल सिलेंडर ११०.९ सीसी इंजिन दिले आहे जे ८.१ पीएस पॉवर आणि ८.७ एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते.
-
या स्कूटरच्या ब्रेकिंग सिस्टीममध्ये कंपनीने पुढच्या आणि मागच्या चाकांमध्ये ड्रम ब्रेक दिले आहेत, ज्यामध्ये ट्यूबलेस टायर देण्यात आले आहेत.
-
मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की ही स्कूटर ६३ किलोमीटर प्रति लीटर मायलेज देते.
-
याची सुरुवातीची किंमत ६१,९०० रुपये आहे जी टॉप मॉडेलमध्ये ६९,५०० रुपयांपर्यंत जाते.
-
टीवीएस स्कूटी जेस्ट (TVS Scooty Zest)
( हे ही वाचा: देशातील सर्वाधिक मायलेज देणारी कार; किंमत पाच लाखांपेक्षाही कमी ) -
ही कंपनीची दुसरी हलक्या वजनाची स्कूटर आहे जी दोन प्रकारांसह लॉंच करण्यात आली आहे.
-
स्कूटरमध्ये सिंगल सिलेंडर १०९७ सीसी इंजिन आहे जे ७.८१ पीएस पॉवर आणि ८.८ एनएम पीक टॉर्क जनरेट करते.
-
या स्कूटरच्या ब्रेकिंग सिस्टीममध्ये ट्यूबलेस टायर्ससह पुढील आणि मागील चाकांमध्ये ड्रम ब्रेक देण्यात आले आहेत.
-
मायलेजबद्दल, टीवीएस दावा करते की ही स्कूटी झेस्ट ६२ किलोमीटर प्रति लीटर चं मायलेज देते.
-
स्कूटी झेस्टची सुरुवातीची किंमत ६४,६४१ रुपये आहे जी टॉप मॉडेलमध्ये ६६,३१८ रुपयांपर्यंत जाते.
(सर्व फोटो ऑफिशियल वेबसाईट -TVS motor, Hero )

डोकं एकीकडे, हाता-पायांचा चेंदामेंदा; मुंबईत लोअर परेलच्या ब्रीजवर भीषण अपघात; टॅक्सीचा चक्काचूर, थरकाप उडवणारा VIDEO