• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. top 5 electrical vehical sales in india rmt

देशात इलेक्ट्रिक कारच्या मागणीत २३४ टक्क्यांची वाढ, टॉप ५ मध्ये टाटाच्या दोन गाड्या

भविष्याचा विचार करता सर्वच कार कंपन्यांनी आपला मोर्चा इलेक्ट्रिक कारकडे वळवला आहे.

November 18, 2021 13:42 IST
Follow Us
  • भविष्याचा विचार करता सर्वच कार कंपन्यांनी आपला मोर्चा इलेक्ट्रिक कारकडे वळवला आहे. वाढतं प्रदूषण, पेट्रोल-डिझेलच्या चढ्या किंमती यामुळे इलेक्ट्रिक वाहनांना पसंती देण्यात येत आहे. मागच्या दिवसात इलेक्ट्रिक वाहनांची प्रचंड मागणी वाढली आहे. (Photo- Indian Express)
    1/6

    भविष्याचा विचार करता सर्वच कार कंपन्यांनी आपला मोर्चा इलेक्ट्रिक कारकडे वळवला आहे. वाढतं प्रदूषण, पेट्रोल-डिझेलच्या चढ्या किंमती यामुळे इलेक्ट्रिक वाहनांना पसंती देण्यात येत आहे. मागच्या दिवसात इलेक्ट्रिक वाहनांची प्रचंड मागणी वाढली आहे. (Photo- Indian Express)

  • 2/6

    Tata Nexon EV ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रिक कार आहे. एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान ३६१८ युनिट्सची विक्री झाली आहे. गेल्या वर्षी याच सहामाहीत हे प्रमाण केवळ १,१५२ युनिट होते. अशा प्रकारे कंपनीच्या Tata Nexon EV च्या विक्रीत २१४% वाढ झाली आहे. Tata Nexon EV एकाच चार्जवर ३१२ किमी अंतर कापते. एक्स-शोरूम किंमत सुमारे १४ लाखांपासून सुरू होते. (Photo- Financial Express)

  • 3/6

    MG Motors या काही वर्षे जुन्या कंपनीच्या MG ZS EV इलेक्ट्रिक गाडीनं देशाच्या बाजारपेठेतही आपला दबदबा निर्माण केला आहे. या वर्षी एप्रिल-सप्टेंबरमध्ये कंपनीने १,७८९ युनिट्सची विक्री केली आहे. गेल्या वर्षी फक्त ५११ युनिट्स होतीMG ZS EV च्या विक्रीत २५०% वाढ झाली आहे. सुमारे २१ लाख रुपयांपासून सुरू होणारी ही इलेक्ट्रिक कार एका चार्जमध्ये ३४० किमीपर्यंत जाते. (Photo- Indian Express)

  • 4/6

    Tata Tigor E ही Tata Motors ची दुसरी इलेक्ट्रिक कार आहे. देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक कारच्या टॉप-5 यादीत आहे. या वर्षी एप्रिल-सप्टेंबरमध्ये कंपनीने त्यातील ८०१ युनिट्सची विक्री केली आहे. गेल्या वर्षी फक्त १०० युनिट होते. गाडीची विक्री ७०१% वाढली आहे. कंपनीची ही कार एका चार्जमध्ये १४२ किमीपर्यंत जाते आणि तिची किंमत ९.५ लाख रुपयांपासून सुरू होते.(Photo- Finacial Express)

  • 5/6

    ह्युंदाई मोटर्सची इलेक्ट्रिक वाहनेच नव्हे तर इतर वाहनेही विक्रीत मागे आहेत. Hyundai Creta नुकतेच ऑक्टोबरच्या टॉप-10 विकल्या जाणाऱ्या वाहनांच्या यादीतून वगळण्यात आले आहे. इलेक्ट्रिक कार विभागात, एप्रिल-सप्टेंबरमध्ये Hyundai Kona इलेक्ट्रिकची विक्री केवळ ५१ युनिट्स होती, जी गेल्या वर्षीच्या १०१ युनिट्सपेक्षा ५०% कमी आहे. एका चार्जमध्ये ४५२ किमी कव्हर करणाऱ्या या कारची किंमत २३.७ लाख रुपयांपासून सुरू होते. (Photo- Indian Express)

  • 6/6

    महिंद्रा ही देशातील इलेक्ट्रिक कार सादर करणाऱ्या पहिल्या कंपन्यांपैकी एक आहे. मात्र गेल्या काही दिवसात विक्रीत घट दिसत आहे. महिंद्रा eVerito एप्रिल-सप्टेंबरमध्ये फक्त २ युनिट्स विक्रीसाठी आहे. हे गेल्या वर्षीच्या ८ युनिटच्या तुलनेत ७५% कमी आहे. या कंपनीची ११ लाख रुपयांपेक्षा कमी किमतीची कार एका चार्जमध्ये १४० किमीपर्यंत जाते. (Photo- AP)

TOPICS
ऑटो न्यूजAuto NewsऑटोमोबाइलAutomobile

Web Title: Top 5 electrical vehical sales in india rmt

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.