-
बीएमडब्ल्यू कंपनीच्या लक्झरी कारप्रमाणेत मोटारसायकलींनाही ग्राहकांनी पसंती दिली आहे. आता जर्मन टू व्हिलर निर्माती कंपनी पहिल्या इलेक्ट्रिक स्कूटरसाठी सज्ज झाली आहे. (Photo- bmw motorcycles)
-
वर्ष २०२० मध्ये इलेक्ट्रिक स्कूटरचं संकल्पना मॉडेल सादर केलं होतं. कंपनीने या वर्षी जुलैमध्ये अधिकृतपणे आपली सर्व-इलेक्ट्रिक स्कूटर बीएमडब्ल्यू CE 04 सादर केली. आता दुचाकी ब्रँडने या इलेक्ट्रिक स्कूटरचे उत्पादन सुरू केले आहे. (Photo- bmw motorcycles)
-
बीएमडब्ल्यू CE 04 इलेक्ट्रिक स्कूटर आकर्षक आहे. इलेक्ट्रिक स्कूटर साय-फाय भविष्यवादी चित्रपटातील स्कूटरसारखी दिसते. (Photo- bmw motorcycles)
-
बीएमडब्ल्यू मोटरराडने इलेक्ट्रिक आणि शहरी भागातील गरज पाहता एक पाऊल पुढे टाकलं आहे. २०१७ साली कंपनीने पहिल्यांदा या दिशेने पाऊल उचललं होतं. (Photo- bmw motorcycles)
-
बीएमडब्ल्यू CE-04 इलेक्ट्रिक स्कूटरची तुलना यामाह XMAX, बीएमडब्ल्यू C400 सारख्या पेट्रोलवर चालणाऱ्या स्कूटरशी केली जाण्याची शक्यता आहे. (Photo- bmw motorcycles)
-
स्कूटरला हलक्या पांढर्या रंगाचे आधुनिक सरफेस फिनिश मिळते, जे ‘फ्लोटिंग’ सीटसह समोर आणि बाजूला मॅट ब्लॅक सेक्शनसह येते. यात लांब साइड प्रोफाइल आहे आणि ट्रेंड-सेटिंग व्हीलमध्ये डिस्क-व्हील लूक आणि साइड स्टँड आहे. (Photo- bmw motorcycles)
-
मॅगेलन ग्रे मेटॅलिक कलर बॉडी, ब्लॅक/ऑरेंज सीट्स, ऑरेंज विंड डिफ्लेक्टर आणि अनेक ग्राफिक्स आहेत. (Photo- bmw motorcycles)
-
बीएमडब्ल्यू CE-04 Standard आणि Avantgarde व्हेरियंटमध्ये आहे. (Photo- bmw motorcycles)
-
इलेक्ट्रिक स्कूटर ३१ kW (४२ hp) ची कमाल उर्जा निर्माण करते. ही स्कूटर केवळ २.६ सेकंदात ० ते ५० किलोमीटर प्रति तास वेग पकडू शकते. तसेच टॉप स्पीड १२० किलोमीटर प्रति तास आहे. (Photo- bmw motorcycles)
-
स्कूटरमध्ये ८.९ kWh क्षमतेचा लिथियम-आयन बॅटरी आहे. बॅटरी फ्लोअरबोर्डच्या आत बसवली आहे. एकदा बॅटरी पूर्णपणे चार्ज झाल्यानंतर ही स्कूटर १३० किमीपर्यंतचे अंतर कापू शकते. त्याची बॅटरी खूप लवकर चार्ज होते. ६.९ किलोवॅट चार्जरच्या मदतीने केवळ १ तास ४० मिनिटांत बॅटरी पूर्ण चार्ज होते. (Photo- bmw motorcycles)
-
हे मॉडेल २०२२ पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात लॉन्च होण्याची शक्यता आहे. BMW CE 04 च्या बेस मॉडेलची किंमत अंदाजे रु. ८.७८ लाख असणे अपेक्षित आहे. BMW Motorrad ही स्कूटर भारतीय बाजारात आणेल की नाही याबाबत स्पष्टता नाही. (Photo- bmw motorcycles)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख