-
लग्नसराईत सोन्याची खरेदी केली जाते. मात्र सोन्याचे चढे भाव पाहता प्रत्येक जण हात आखुडता घेतो. मात्र घेतलेलं सोनं शुद्ध आहे की नाही, याबाबत कायम प्रश्न असतो. (Photo- Indian Express)
-
आता हॉलमार्कशिवाय दागिन्यांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे.. (Photo- Indian Express)
-
१ डिसेंबरपासून देशातील २५६ जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंगचे नियम पूर्णपणे पाळावे लागणार आहेत. (Photo- Indian Express).
-
दुकानाबाहेर इथे हॉलमार्क ज्वेलरी विकली जाते असं लिहीवं लागणार आहे. (Photo- संग्रहित)
-
हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट नियमांनुसार चालते. (Photo- PIB)
-
हॉलमार्क ज्वेलरीवर BIS (भारतीय मानक ब्यूरो) मार्क ओळख असेल. (Photo- Indian Express)
-
आता 2 ग्रॅमपेक्षा जास्त वजनाचे दागिने बीआयएस मान्यताप्राप्त केंद्रातून तपासावे लागतील आणि त्यावर संबंधित कॅरेटचे बीआयएस चिन्ह लावले जाईल. (Photo- Indian Express)
-
प्रत्येक ज्वेलरीची कॅरेट किंवा फायनान्स शुद्धता असेल. 916 लिहीलं असेल तर ज्वेलरी २२ कॅरेटची आहे. (Photo- Indian Express)
-
२४ कॅरेट सोन्यापासून दागिने बनवले जात नाहीत. २४ कॅरेट सोने हे सर्वात शुद्ध सोने मानले जाते परंतु ते दागिने बनवत नाही कारण ते खूप मऊ आहे. (Photo- Indian Express)
-
प्रत्येक कॅरेटचा वेगळा हॉलमार्क क्रमांक असेल. उदाहरणार्थ, २४ कॅरेटवर 999, २३ कॅरेट सोन्यावर 958, २२ कॅरेटवर 916, २१ कॅरेटवर 875 आणि १८ कॅरेटवर 750 लिहीलं असेल. (Photo- PIB)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”