-
करोना संकटामुळे १८ वर्षांवरील सर्वांना लस घेणं गरजेचं आहे. भारतात आतापर्यंत कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्डसह सहा लसींना मान्यता मिळाली आहे.
-
लसीकरण केंद्रावर कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचं मोफत लसीकरण केलं जात आहे. तर इतर लसी खासगी रुग्णालयं, दवाखान्यात पैसे मोजून मिळत आहेत.
-
लसींचे दोन डोस झाल्यानंतर १४ दिवसांनी लसीकरण प्रमाणपत्र मिळतं. सार्वजनिक वाहतूक करताना अनिवार्य आहे.
-
वॅक्सिन सर्टिफिकेटवर नाव, वय, आयडीसह लसीकरणाची माहिती व एक QR कोड दिला जातो.
-
क्यूआर कोडमुळे कोणीही फोटो लावून बनावट सर्टिफिकेटवर तयार करू शकत नाही. तरीही सर्टिफिकेट बनावट असण्याची शक्यता असते.
-
वॅक्सिन सर्टिफिकेटची सत्यता दोन पद्धतीने तपासू शकता. वॅक्सिनच्या प्रमाणपत्रावर QR कोड असतो. हा कोड स्कॅन करून तुम्ही सत्यता तपासू शकता.
-
ऑनलाईन व्हेरिफिकेशनसाठी सर्वात प्रथम https://verify.cowin.gov.in/ वेबसाइटवर जा.
-
त्यानंतर स्कॅन क्यूआर कोडवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर क्यूआर कोड दिसेल.
-
फोनच्या स्कॅनरने स्कॅन केल्यानंतर तुमच्या समोर नाव, वय, लिंग लस घेतल्याची तारीख, सर्टिफिकेट व अन्य माहिती येईल.
-
सर्टिफिकेट बनावट असल्यास त्याबाबतचा मेसेज देखील स्क्रीनवर दिसेल.

भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”