-
कितीही फॅशन येवो पण जीन्सची चलती आजही तितकीच आहे. लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्वजण जीन्स वापरण्यास पसंती देतात.
-
आज ट्रेंडमध्ये असणारी ही जीन्स तुम्हाला माहित आहे का की मजुरांसाठी तयार केली गेली होती.
-
जीन्स बनवण्यामागचं कारण म्हणजे कामगारांचे कपडे लवकर घाण होतात. कपडे पुन्हा पुन्हा धुवावे लागू नयेत म्हणून जीन्सचा शोध लागला. आता प्रत्येकजण जीन्स घालतो, मग तो मजूर असो वा मास्तर.
-
तुम्ही जीन्स घातली असेल तर तुमच्या लक्षात आले असेल की जीन्सच्या बाजूच्या खिशात अजून एक छोटा खिसा असतो.
-
अनेकांच्या मते तो खिसा म्हणजे कॉइन पॉकेट आहे.
-
पण तुम्हाला माहीत आहे का की हे कॉइन ठेवण्यासाठी बनवले गेले नसून ते बनवण्यामागचे कारण काहीतरी वेगळे होते.
-
त्या छोट्या खिशाचा खरा उपयोग नाणी ठेवण्यासाठी नसून लहान घड्याळ ठेवण्यासाठी होता.
-
खरं तर, १८व्या शतकात, जगभरात एक लहान साखळी घड्याळ वापरले जात होते. हे घड्याळ आपल्याजवळ ठेवण्यासाठी हा छोटासा कप्पा जीन्समध्ये बनवला होता.
-
जीन्समध्ये बनवलेला हा छोटा खिसा सर्वप्रथम लेव्ही स्ट्रॉस नावाच्या कंपनीने सुरू केला. आज ही कंपनी लुईस या नावाने जगभर प्रसिद्ध आहे.
-
.जीन्समध्ये असलेल्या या जागेला ‘वॉच पॉकेट’ म्हणतात. जुन्या काळी त्यात कामगार चैन असलेलं घड्याळ ठेवत. मात्र, नंतर जेव्हा चैन असलेलं घड्याळाचा ट्रेंड कमी झाला तेव्हा लोकांनी कॉइन ठेवण्यासाठी त्याचा वापर सुरू केला.
-
या छोट्या जागेत घड्याळ ठेवल्याने घड्याळ तुटण्याची शक्यता कमी होत असल्याने हा खिसा छोटा करण्यात आला होता.
-
Dr. Ambedkar Jayanti: डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर पाठवा ‘या’ खास मराठमोळ्या शुभेच्छा; पोस्ट करा सुंदर HD Images