-
व्हॉट्सअॅप आता केवळ मजकूर आणि व्हिडिओ संदेश पाठवण्यासाठी मेसेंजर राहिलेले नाही. याद्वारे तुम्ही UPI प्रमाणे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसेही ट्रान्सफर करू शकता.
-
मेटा-मालकीच्या इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp ने ही सेवा २०२१ मध्ये सुरू केली आहे. जे Google Pay, PhonePe आणि Paytm सारखे पेमेंट पर्याय देते.
-
व्हॉट्सअॅप म्हटल्याप्रमाणे पैसे पाठवणं सुरक्षित असणार आहे. कारण प्रत्येक व्यवहारासाठी UPI पिन अनिवार्य असणार आहे. WhatsApp payments अॅण्ड्राईड आणि आयओएस अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध आहे. त्यासाठी फक्त अॅप अपडेट करावं लागणार आहे.
-
व्हॉट्सअॅपने नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या सहकार्यानं UPIवर आधारित पेमेंट सिस्टिम तयार केली आहे.
-
व्हॉट्सअॅपने पेमेंट सेवेसाठी पाच मोठ्या बँकांसोबतही करार केला आहे. यात ICICI bank, HDFC bank, Axis bank, SBI आणि JIO Payments bank यांचा समावेश आहे.
-
जर तुम्ही अजून कोणाला WhatsApp द्वारे पैसे ट्रान्सफर केले नसेल. त्यामुळे इथे तुम्ही सहज पैसे पाठवायला आणि मिळवायला शिकू शकता
-
व्हॉट्सअॅप देखील इतर UPI पेमेंट अॅप गुगल पे, फोन पे किंवा पेटीएमप्रमाणे काम करते. ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या बँक खात्याशी व्हॉट्सअॅप लिंक करावे लागेल. पिन सेट करून, तुम्ही त्वरित पेमेंटचा लाभ मिळवू शकता.
-
WhatsApp पेमेंट्स कसे सेट करायचे?
-तुमच्या मोबाईल फोनवर Android किंवा iOS WhatsApp उघडा
-सेटिंग्ज मेनूवर जा.
-खाली स्क्रोल करा आणि पेमेंट पर्यायावर टॅप करा.
-सूचीमधून बँक निवडून बँक खात्याचे तपशील जोडा.
-बँक खात्याचे तपशील यशस्वीरित्या जोडले गेले. -
WhatsApp ने पैसे कसे पाठवायचे?
-एकदा तुमचे बँक खाते कनेक्ट झाल्यानंतर, तुम्ही WhatsApp वापरून पैसे पाठवू किंवा मिळवू शकता.
-पैसे पाठवण्यासाठी अॅप उघडा
-पेमेंट पर्यायांवर जा
-तुमचे बँक खाते निवडा
-रक्कम एंटर करा.
-UPI पिन द्वारे तुमचा व्यवहार आता यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. -
WhatsApp वापरून पैसे कसे मिळवायचे? तुम्ही प्रथम खात्री केली पाहिजे की तुमचे WhatsApp पेमेंट बँक खात्याशी लिंक झाले आहे. खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.
-WhatsApp अॅप उघडा
-सेटिंग्ज मेनूवर जा
-पेमेंट पर्यायावर जा
-बँकेचे नाव निवडा
-तुमचे बँक खाते जोडा.

Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही