-
आज रात्री घडाळ्यात १२ वाजताचा ठोका झाला की, फोनवर नववर्षाचे मॅसेज झळकू लागतील. कुटुंब, जवळचे नातेवाईक आणि मित्र मंडळी एकमेकांना मॅसेजच्या माध्यमातून शुभेच्छा देतील. या शुभेच्छा संदेश देण्यासाठी सर्वाधिक वापर हा व्हॉट्सअॅपचा होतो.
-
व्हॉट्सअॅपवर एक तर ग्रुपवर किंवा वैयक्तिक मॅसेज पाठवण्याची सोय आहे. तुम्हाला व्हॉट्सअॅपवर एकाच वेळी अनेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील, तर त्यासाठीही एक मार्ग आहे. यासाठी तुम्हाला ग्रुप तयार करण्याची गरज नाही. तुम्ही एकाच वेळी २५० लोकांना मेसेज पाठवू शकता.
-
व्हॉट्सअॅपवर सर्वात सोपा मार्ग म्हणजे ब्रॉडकास्ट लिस्ट तयार करणे. याच्या मदतीने तुम्ही एकाच वेळी शेकडो लोकांना संदेश पाठवू शकता. यामध्ये तुम्हाला प्रत्येक वेळी सर्व कॉन्टॅक्ट्स सिलेक्ट करण्याची गरज नाही.
-
जर तुमचा संपर्क क्रमांक रिसीव्हरच्या फोनमध्ये सेव्ह केला असेल, तर त्यांना तुमचा संदेश सामान्य खासगी चॅटप्रमाणे मिळेल. जर त्यांनी मेसेजला रिप्लाय दिला तर तुम्हाला तोही मिळेल. हे व्हॉट्सअॅप ग्रुपपेक्षा वेगळं आहे. येथे तुम्ही सर्वांशी खासगी चॅट करू शकता.
-
व्हॉट्सअॅपवर ब्रॉडकास्ट लिस्ट तयार करण्यासाठी तुम्हाला वरच्या उजव्या बाजूला असलेल्या तीन व्हर्टिकल डॉट मेनूवर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला New Broadcast पर्यायावर क्लिक करावे लागेल. आता तुम्हाला ज्याला संदेश पाठवायचा आहे तो संपर्क निवडा.
-
प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, ब्रॉडकास्ट सूची उघडा आणि तुमचा संदेश टाइप करा आणि सेंड चिन्हावर क्लिक करा. हा खासगी संदेश तुमच्या अॅड केलेल्या सर्व संपर्कांपर्यंत पोहोचेल.
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”