-
गेल्या काही दिवसात करोना विषाणू संसर्गाच्या प्रकरणांमध्ये विक्रमी वाढ झाली आहे. ओमायक्रॉनने अनेक राज्यांमध्ये आपले पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र, दिल्ली आणि केरळमध्ये ओमायक्रॉनचे वाढते रुग्ण पाहता चिंता वाढली आहे.
-
सध्या ऑक्सिमीटर ही लोकांच्या खूप उपयोगाची गोष्ट आहे. ऑक्सिमीटर हे रक्तातील ऑक्सिजन पातळी तपासण्यासाठी एक लहान मशीन आहे. रक्तातील ऑक्सिजनच्या पातळीमुळे होणाऱ्या रोगांवर लक्ष ठेवण्यासाठी हे खूप प्रभावी आहे. (Photo- Pixabay)
-
बहुतेक लोक जंतू, जीवाणू आणि विषाणू टाळण्यासाठी यूव्ही निर्जंतुकीकरण वापरतात. सॅनिटायझर्स तुमचे हात स्वच्छ करतात, परंतु कारच्या चाव्यापासून तुमचे शूज, फोन इत्यादींमधील जंतू नष्ट करण्यात यूव्ही निर्जंतुकीकरण अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. (Photo- Indian Express)
-
उच्च किंवा कमी रक्तदाब असण्याची समस्या झपाट्याने वाढली आहे. करोनाच्या काळात लोकांना याची सर्वात जास्त गरज आहे. तरुणांना रक्तदाबाच्या समस्येचा सामना करावा लागतो. ब्लड प्रेशर मॉनिटर तुमच्यासोबत कुठेही नेऊ शकतो. प्रत्येक घरात बीपी मॉनिटर असणे गरजेचे आहे. (Photo- Pixabay)
-
करोनाचा प्रसार पुन्हा एकदा झपाट्याने होत आहे. संसर्ग झाल्यानंतर संक्रमित व्यक्ती स्वत:ला विलगीकरण रुममध्ये ठेवते. त्यांच्यासाठी पोर्टेबल ऑक्सिजन ही एक मोठी गोष्ट आहे. बाजारात पोर्टेबल ऑक्सिजन सिलिंडरचे अनेक ब्रँड आणि पर्याय उपलब्ध आहेत जिथून तुम्ही ते विकत घेऊ शकता. (Photo- Pixabay)
-
रॅपिड अँटीजेन टेस्टच्या मदतीने तुम्ही घरी बसून ही चाचणी करू शकता, या चाचणीसाठी नाकातील नमुना नळीद्वारे घेतला जातो. नाकातून घेतलेले द्रव चाचणी किटमध्ये ठेवले जाते. हे किट कमी वेळात करोनाचे परिणाम सांगते. (Photo- Indian Express)

Thirsty Cheetahs Viral Video : तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं! Video व्हायरल होताच वन विभागाचा चालक निलंबित