-
Jio, Airtel आणि Vodafone Idea सारख्या सर्व टेलिकॉम कंपन्या त्यांच्या एका महिन्याच्या रिचार्ज प्लॅनमध्ये २८ दिवसांची वैधता का देतात? याबाबत तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर जाणून घ्या
-
आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की या कंपन्या दोन दिवसांची वैधता कमी करून कोट्यवधी रुपये कसे कमावतात. या दोन दिवसांमुळे १२ महिन्यात किती दिवस वाचतात याचा अंदाज करा. ३१ दिवसांच्या महिन्यातही २८ दिवसच वैधता मिळते. म्हणजे प्रत्येक महिन्याचे दोन ते ३ दिवस पकडले तर एक महिना वाचतो.
-
गेल्या काही दिवसात जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन कंपन्यांनी आपल्या प्लानच्या किंमती वाढवल्या आहेत. त्याचा थेट फटका ग्राहकांना बसला आहे.
-
आता महागाईच्या झळा जीवनावश्यक बनललेल्या मोबाईल रिचार्जच्या किंमतीपर्यंत पोहोचल्या आहेत. दूरसंचार कंपन्यांनी आपल्या प्लानमध्ये वाढ केली आहे.
-
कंपन्यांनी प्लानचे भाव वाढवले असले तरी मोबाईल रिफील करणं शेवटी गरजेच होतं. कुठेही पोर्ट केलं तर ३० दिवसांऐवजी २८ दिवसांचा अवधी मिळतो.
-
तुम्ही दर महिन्याला रिचार्ज केल्यास, तुम्ही एका वर्षात १२ ऐवजी १३ महिन्यांसाठी पैसे भरता. कारण मासिक रिचार्जमध्ये तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या २८ दिवसांच्या वैधतेनुसार १२ महिन्यांसाठी ३३६ दिवसांचे फायदे मिळतात.
-
उदाहरणार्थ, जर तुम्ही १३ महिन्यांसाठी रिचार्ज केले तर तुम्हाला एकूण ३६४ दिवसांची वैधता मिळेल. आम्ही तुम्हाला सांगतो की Jio, Airtel आणि Vi सारख्या कंपन्या या तेराव्या रिचार्जमधून कोट्यवधी रुपये कमावतात.
-
एअरटेलच्या सरासरी प्रत्येक व्यक्तीचा रिचार्ज पाहिला आणि १५३ रुपये युजर बेस ३५.४४ कोटीशी गुणलं तर कंपनी १३ व्या रिचार्जला ५ हजार ४१५ कोटी रुपये कमावते.
-
देशातील नंबर एक टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओबद्दल बोलायचे तर, जिओने या तेराव्या रिचार्जमधून सुमारे ६,१६८कोटी रुपये कमावले आहेत. हा आकडा कंपनीच्या वापरकर्त्याच्या आधारे सरासरी कमाईवर व्यक्तीचा गुणाकार करून समोर आला आहे.
-
Vi बद्दल सांगायचे तर, त्याच्या एका रिचार्ज प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना ९० दिवसांऐवजी ८४ दिवसांची वैधता देते. त्याचप्रमाणे, रिचार्जच्या महिन्यात ३० ऐवजी केवळ २८ दिवसांची वैधता दिली जाते. Vi अशा प्रकारे रु.२९३४ कोटी कमावते.

“असा असतो मराठी मुलींचा दणका”, ‘नटीनं मारली मिठी’ गाण्यावर तरुणींचा जगात भारी डान्स! VIDEO पाहून म्हणाल, वाह्ह…