-
देशात बिस्किटांचे नाव घेतले तर जिभेवर पार्ले-जी (Parle-G) हे नाव येतचं. ( फोटो Pixabay)
-
९० च्या दशकातील मुलांनाही त्यांचा काळ आठवेल, जेव्हा चहासोबत पार्ले जीचे कॉम्बिनेशन ते खायचे. (पार्ले जी ऑफिशियल वेबसाईट)
-
त्या काळी पार्ले जी च्या जाहिराती खूप गाजल्या होत्या. बिस्किटाच्या पॅकेटवर छापलेल्या मुलीच्या फोटोबद्दल अनेक दंतकथाही सांगितल्या गेल्या. (पार्ले जी ऑफिशियल वेबसाईट)
-
अजून एक गोष्ट लोकांच्या तोंडावर असायची. जी म्हणजे जीनियस. पण तुम्हाला माहित आहे की हा G प्रत्यक्षात का वापरला गेला? याबद्दल जाणून घ्या
-
ही कथा सुरुवातीच्या पार्ले नावाने सुरू होते. स्वातंत्र्यापूर्वी पार्ले जीचे नाव ग्लुको बिस्किट होते. (पार्ले जी ऑफिशियल वेबसाईट)
-
दुसऱ्या महायुद्धात भारतीय आणि ब्रिटीश सैनिकांचे ते आवडते बिस्किट होते. पण स्वातंत्र्यानंतर ग्लुकोजचे उत्पादन थांबले. वास्तविक, ते तयार करण्यासाठी गव्हाचा वापर केला जात होता आणि त्यावेळी देशात अन्न संकट होते. (पार्ले जी ऑफिशियल वेबसाईट)
-
मात्र, पुन्हा उत्पादन सुरू झाल्यावर अनेक कंपन्या वादात सापडल्या. विशेषतः ब्रिटानियाने ग्लुकोज- डी (GLOCKZ-D) सह बाजारपेठ काबीज करण्याचा प्रयत्न केला. (पार्ले जी ऑफिशियल वेबसाईट)
-
त्यानंतर ग्लुको बिस्किट पुन्हा लाँच करण्यात आले. यावेळी त्याला पार्ले-जी असे नाव देण्यात आले आणि मुखपृष्ठावर एका लहान मुलीचा फोटो लावण्यात आला. (पार्ले जी ऑफिशियल वेबसाईट)
-
पार्ले हे नाव मुंबईतील विर्ले-पार्ले परिसरातून घेण्यात आल्याचे सांगितले जाते. जिथे त्याचा कारखाना असायचा. (पार्ले जी ऑफिशियल वेबसाईट)
-
त्या नावातल्या जी (G) चा अर्थ ग्लुकोज असा आहे. खरं तर, पार्ले-जी ही ग्लुकोज बिस्किटे आहे. ( फोटो Pixabay)
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘G म्हणजे जीनियस’ ची जाहिरात २००० साली झाली होती. (पार्ले जी ऑफिशियल वेबसाईट)
-
कथा आणि नाव काहीही असो, पण आज पार्ले दर महिन्याला सुमारे १ अब्ज पॅकेट बिस्किटांचे उत्पादन करते. (लोकसत्ता फाइल फोटो)
झटका मटणासाठी नितेश राणेंनी आणलं मल्हार प्रमाणपत्र; म्हणाले, “सर्टिफिकेट नसेल तर हिंदूंनी…”