-
ताप, सर्दी, खोकला यासारख्या तब्येतीच्या तक्रारी आपल्यापैकी अनेकांना सतावत असतात. लहान असताना किंवा मोठे झाल्यानंतर आपल्यापैकी बहुतेकजण डॉक्टरकडे गेल्यानंतर आपण त्यांना समस्या सांगतो.
-
त्यावेळी अनेकदा आपल्याला डॉक्टर जीभ दाखवायला सांगतात. आपल्या जीभेवर टॉर्च मारुन ते तपासणी करतात.
-
पण ते असं का करतात? याद्वारे त्यांना खरोखर झालेला आजार, आपली आरोग्याची अचूक स्थिती कशी कळते, असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. आज आपण या प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत.
-
आजारी झाल्यावर डॉक्टर आपल्याला स्टेथोस्कोपने तपासणे आणि जीभ बाहेर काढून तपासणे, या दोन गोष्टी करतात.
-
जीभ हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे अनेक डॉक्टर हे फक्त जिभेकडे पाहूनच तुमची स्थिती सांगतात.
-
आपल्याला झालेल्या बर्याच आजारांचा परिणाम हा थेट जीभेवर दिसून येतो.
-
जीभ ही पचनसंस्थेचा आरसा आहे असे म्हटले जाते. त्यामुळे अनेक डॉक्टर हे जीभ पाहून काही आजारांचे निदान करतात.
-
जीभ बाहेर काढायला लावून डॉक्टर त्याचा रंग, जमलेला थर, आकार आणि हालचाली बघतात. त्यावरुन डॉक्टरांना त्या व्यक्तीला नेमकं काय झालं हे समजते.
-
जर तोंड आले असेल किंवा दातांचा आजार असेल तर तोंडाची नीट स्वच्छता होत नाही. त्यामुळे जीभेवर एक विशिष्ट थर जमतो.
-
निरोगी व्यक्तीची जीभ ही लालसर, ओली आणि विशिष्ट आकाराची असते. त्यांच्या जीभेच्या मागील बाजूला थोडासा थर असतो.
-
तर काहींच्या जीभेवर पांढरा- पिवळा थर जमला असेल तर ते आजारपणाचे किंवा अस्वच्छतेचे लक्षण असते.
-
ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जीभ ही निळसर पडते. सर्दी झाल्यानंतर किंवा नाक चोंदल्यामुळे जीभेवर एक विशिष्ट थर जमा होतो.
-
कावीळ झालेल्या व्यक्तीची जीभ ही पिवळसर दिसते. त्या व्यक्तीच्या शरीरात रक्ताची कमी असते. त्यामुळे त्याची जीभ लाल न दिसता फिकट पिवळी दिसते.
-
त्यासोबत टायफॉईडचा ताप असेल तर जीभेचा मध्यभाग हा थरयुक्त असतो. तर पचनसंस्थेचा आजार, अजीर्ण झालेले असल्यास, क्षयरोग, मधुमेहाचा आजार झाल्यावर त्याचा थर जीभेवर जमतो.
तसेच जर तुम्हाला उलट्या, जुलाब यासारखे आजार झाले असतील किंवा शरीरातून मोठ्या प्रमाणात पाणी गेले असेल तर तुमची जीभ कोरडी दिसू लागते. जर तुम्हाला एखादा तीव्र आजार झाला असेल तर जीभ कोरडी दिसते. जर जीभ एका बाजूला दिसत असेल, तर ते पक्षाघाताचे लक्षण असते.

शनीदेव घेऊन आले सुखाचे दिवस; मकर राशीची साडेसाती संपताच ‘या’ तीन राशींना गडगंज श्रीमंतीचे सुख लाभणार