-
कडाक्याच्या थंडीमुळे आणि सतत बदलणाऱ्या हवामानामुळे सर्दीसोबत खोकल्याचीही समस्या उद्भवते. डॉक्टरकडे जाण्याचं टाळून खोकल्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी आपण अनेक घरगुती उपाय करतो.
-
कधी कधी अनेक उपाय करूनही ७-८ दिवस खोकला बरा होत नाही. अशा वेळी विलंब न करता ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा. कदाचित, हा दीर्घ काळ सुरू असलेला खोकला मोठ्या आजारांना निमंत्रण देऊ शकतो.
-
दमा असणाऱ्या व्यक्तींना सातत्याने खोकल्याचा त्रास जाणवतो. दमा आजारामुळे आपल्या श्वासाच्या नळ्या आकुंचन पावतात आणि श्लेष्मा तयार होतो. हा श्लेष्मा शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा रोखतो. त्यामुळे रुग्णाला खोकला होतो.
-
काही वेळा हवामानातील बदलामुळे सर्दीसोबत खोकल्याचा त्रास होतो. असा खोकला कधीकधी दीड ते दोन महिने त्रास देतो. या प्रकारचा खोकला बरा होण्यास वेळ लागतो.
-
धुम्रपान हे खोकल्याचे प्रमुख कारण आहे. वास्तविक, तंबाखूमध्ये असलेल्या रासायनिक घटकांमुळे फुफ्फुसात जळजळ होते. खोकल्याद्वारे ही चिडचिड दूर करण्यासाठी शरीर श्लेष्मा बनवते. त्यामुळे रुग्णाला खूप खोकला येतो. धुम्रपान लवकर बंद केले नाही तर क्षय रोगासारखे इतर मोठे आजार होण्याचा धोका वाढतो.
-
जर तुमचा खोकला औषधानंतरही बराच काळ जात नसेल तर हे फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचे लक्षण असू शकते. अशा स्थितीत खोकताना रक्तही येऊ शकते. अशी लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरु करा.

४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी