-
उत्तम आरोग्यासाठी पौष्टिक आहारासोबतच व्यायामाचीही गरज असते. दिवसातून ३०-४५ मिनिटे व्यायाम करणे गरजेचे असते.
-
परंतु, बदललेल्या जीवनशैलीमुळे आपल्यापैकी कित्येकजण आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. अनेक जण व्यायाम करण्यास कंटाळा करतात.
-
नियमित व्यायाम आणि योग्य आहार न घेतल्यास मधुमेह, हृदयविकार यांसारखे आजार उद्भवू शकतात.
-
करोनामुळे अनेक जण घरातूनच काम करत आहेत. एकाच जागी बसून काम केल्याने आणि व्यायामाकडे दुर्लक्ष केल्यामुळे तुमचे वजन वाढून लठ्ठपणा येऊ शकतो.
-
यासाठी नियमित व्यायाम करा. त्यामुळे शरीरातील कॅलरीज बर्न होऊन तुम्ही तंदुरुस्त राहाल.
-
योग्य आहार आणि व्यायाम न केल्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. त्यामुळे मधुमेहासारखा आजार उद्भवतो.
-
दिवसेंदिवस मधुमेह असणाऱ्या नागरिकांचे प्रमाण वाढत चालले आहे. जगातील मधुमेह असणाऱ्यांची संख्या जास्त असलेल्या देशांमध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो. त्यामुळे शरीराची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.
-
अनेक जण हाडे आणि सांधेदुखीच्या तक्रारी करतात.
-
व्यायाम न केल्यामुळे शरीर, पाठ, कंबर किंवा हात पाय दुखतात. त्यामुळे नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे.
-
व्यायाम न केल्याने केवळ शारीरिकच नाही तर मानसिक समस्यांनाही सामोरे जावे लागते. तुमच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नैराश्य देखील येऊ शकते.
-
हृदय निरोगी ठेवण्यासाठी व्यायामाची आवश्यकता असते.
-
नियमित व्यायाम केल्यामुळे शरीरातील कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रणात राहते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

‘झी मराठी’ची मालिका संपली; आता लोकप्रिय अभिनेत्रीची ‘स्टार प्रवाह’च्या मालिकेत एन्ट्री! पहिल्यांदाच साकारणार खलनायिका