-
योग्य आहार आणि व्यायाम न केल्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. त्यामुळे मधुमेहासारखा आजार उद्भवतो.
-
मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
-
मधुमेहींच्या शरीरात साखरेचे प्रमाण वाढल्यास हृदयविकाराचा झटका, ब्रेन स्ट्रोक, किडनी निकामी होणे यांसारख्या आजरांचा धोका वाढतो.
-
काही सोप्या पद्धतींद्वारे तुम्ही तुमच्या शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवू शकता.
-
मधुमेह हा लोकांच्या जीवनशैलीशी निगडीत आहे. त्यामुळे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
-
मधुमेह असणाऱ्यांनी भरपूर प्रमाणात फॅक्ट असलेले दूध घेणे टाळावे. त्यामुळे दुधाच्या सेवनाने शरीरातील साखरेचे प्रमाण वाढू शकते.
-
मधुमेहाने त्रस्त असलेल्यांनी अधिकाधिक पाणी पिऊन शरीर हायड्रेटेड ठेवणे गरजेचे आहे.
-
रक्तातील साखरेची पातळी समतोल राखण्यासाठी ताण-तणावापासून दूर राहावे.
-
मधुमेहाच्या रुग्णांनी मॅग्नेशियम आणि क्रोमियमयुक्त पदार्थांचे सेवन करावे. याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.

“त्याने मला ओळखही दिली नाही”, कपिल शर्माच्या वागणूकीवर ज्येष्ठ अभिनेत्याची नाराजी; म्हणाले, “संपूर्ण देश माझ्या पाया…”