-
रोज डे, ७ फेब्रुवारी २०२२: रोज डेच्या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तीला लाल गुलाबाचं फूल देऊन प्रेम व्यक्त केलं जातं. खास करून तरूण आपल्या प्रेयसीला फूल देतात. मात्र या दिवशी दोघांनी एकमेकांना गुलाबाचं फूल दिलं तर दिवस स्मरणात राहतो. हा दिवस खास बनवण्यासाठी, जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला भेटलात तर तुम्ही त्याला फूल देऊ शकता किंवा पुष्पगुच्छ देऊ शकता. परंतु काही कारणास्तव बाहेरगावी असल्यास ऑनलाइन डिलिव्हरी प्लॅटफॉर्मद्वारे प्रिय व्यक्तीला गुलाब पोहोचवू शकता. (Photo- Pixabay)
-
प्रपोज डे, ८ फेब्रुवारी २०२२: प्रपोज डे म्हणजे व्हॅलेंटाईन वीकचा दुसरा दिवस. या दिवशी प्रत्येकजण आपल्या आवडीच्या मुलीला किंवा मुलाला प्रपोज करतो. प्रपोज करण्यासाठी हा सर्वोत्तम दिवस असल्याचं म्हटलं जातं. या दिवशी जर तुम्हाला एखाद्या खास व्यक्तीला प्रपोज करायचे असेल तर तुम्ही त्याला एखाद्या रोमँटिक ठिकाणी प्रपोज करू शकता. तुम्हाला भेटता येत नसेल तर तुम्ही व्हिडीओ कॉलवरही तुमच्या भावना व्यक्त करू शकता. (Photo- Pixabay)
-
चॉकलेट डे, ९ फेब्रुवारी २०२२: व्हॅलेंटाईन वीकचा तिसरा दिवस चॉकलेट डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी तुमच्या प्रिय व्यक्तीला चॉकलेट देऊन तुम्ही हा दिवस खास बनवू शकता. जर तुम्हाला हा दिवस आणखी खास बनवायचा असेल तर तुम्ही तुमच्या हाताने बनवलेले चॉकलेट देऊ शकता. यामुळे प्रिय व्यक्तीला जास्त आनंद मिळेल. (Photo- Pixabay)
-
टेडी डे, १० फेब्रुवारी २०२२: या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तीला टेडी भेट म्हणून द्यायचा असतो. तुम्ही तुमच्या जोडीदाराला टेडी गिफ्ट करत असाल तर लक्षात ठेवा की तुम्ही गुलाबी किंवा लाल रंगाचा टेडी गिफ्ट केल्यास त्यांना तो आणखी आवडेल. याचे कारण म्हणजे मुलींना लाल आणि गुलाबी रंग खूप आवडतात. (Photo- Pixabay)
-
प्रॉमिस डे, ११ फेब्रुवारी २०२२: व्हॅलेंटाईन वीकचा पाचवा दिवस प्रॉमिस डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जोडपे एकमेकांना काही वचने देतात आणि ती पूर्ण करतात. वचन देताना आत्मविश्वासाने द्या. (Photo- Pixabay)
-
हग डे, १२ फेब्रुवारी २०२२: मिठी मारण्याचे वेगवेगळे अर्थ आहेत. काही लोक एकमेकांना सोडून जाताना मिठी मारतात तर काही लोक मैत्रीत मिठी मारतात. पण व्हॅलेंटाईन वीकमध्ये तुम्ही तुमच्या जोडीदाराला प्रेमळ मिठी देऊन तुमचे प्रेम व्यक्त करू शकता. (Photo- Pixabay)
-
किस डे, १३ फेब्रुवारी २०२२: व्हॅलेंटाइन विकचा सहावा दिवस म्हणजे किस डे. व्हॅलेंटाइन डेच्या आदल्या दिवशी हा डे साजरा केला जातो. अनेक जण या दिवसाकडे प्रेमभावनेने पाहतात. (Photo- Pixabay)
-
व्हॅलेंटाइन डे, १४ फेब्रुवारी २०२२: तरुण मंडळी १४ फेब्रुवारीची आतुरतेने वाट पाहात असतात. या दिवशी तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत रोमँटिक लंचसाठी जाऊ शकता किंवा लांबच्या राइडवर जाऊ शकता. (Photo- Pixabay)
२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य